२९९ नवे रुग्ण, तर पाचजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:23 IST2021-04-14T04:23:15+5:302021-04-14T04:23:15+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९९ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले असून, पाचजणांचा मृ़त्यू झाला आहे. मात्र मृतातील ...

299 new patients, five deaths | २९९ नवे रुग्ण, तर पाचजणांचा मृत्यू

२९९ नवे रुग्ण, तर पाचजणांचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९९ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले असून, पाचजणांचा मृ़त्यू झाला आहे. मात्र मृतातील दोघेजण अन्य जिल्ह्यातील आहेत. दिवसभरामध्ये १८१ जण बरे होऊन घरी गेले असून, सध्या २५२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नव्या आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ११६ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत, तर ४२ रुग्ण हे नगरपालिका क्षेत्रातील आहेत. दिवसभरामध्ये ७३० जणांची तपासणी करण्यात आली असून, ९७३ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. २६४ जणांची अन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे. गुढीपाडव्यामुळे आज स्वॅब देण्यास जाणाऱ्यांची संख्या निम्म्याहून कमी आली आहे.

मृतांमध्ये भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील ५८ वर्षांच्या पुरुषाचा, गडहिंग्लज तालुक्यातील मांगलेवाडी येथील ६५ वर्षीय महिलेचा आणि पुजारी मळा, इचलकरंजी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मोशी, पुणे आणि संगमेश्वर तालुक्यातील एकाचा मृतांमध्ये समावेश आहे.

चौकट

आजरा ९

भुदरगड ३

चंदगड २

गडहिंग्लज १८

गगनबावडा १

हातकणंगले ३०

कागल ८

करवीर ३७

पन्हाळा ११

राधानगरी १०

शाहूवाडी ३

शिरोळ ४

नगरपालिका ४२

कोल्हापूर महापालिका ११६

अन्य जिल्हे १४

एकूण २९९

Web Title: 299 new patients, five deaths