‘अकरावी’च्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या दिवशी २९५ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:25+5:302020-12-15T04:40:25+5:30
चौकट - शिवाजी विद्यापीठातही विद्यार्थ्यांची गर्दी शिवाजी विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू ...

‘अकरावी’च्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या दिवशी २९५ अर्ज
चौकट -
शिवाजी विद्यापीठातही विद्यार्थ्यांची गर्दी
शिवाजी विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत शुल्काचे चलन भरण्याची व्यवस्था विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील खोली क्रमांक १०७ मध्ये केली आहे. त्या ठिकाणी सोमवारी विद्यार्थ्यांनी गर्दी केली. मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेर विद्यार्थ्यांची रांग लागली होती.
चौकट
जिल्ह्यातील ९६० शाळा सुरू
जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ९६० शाळा सोमवारपर्यंत सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये १४४२५७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. शाळा सुरू करण्यात हातकणंगले (१६२ शाळा), करवीर (११०), पन्हाळा (९२), कागल (८५) तालुका आघाडीवर आहे.
फोटो (१४१२२०२०-कोल-विद्यापीठ रांग) : शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी सोमवारी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीबाहेर विद्यार्थ्यांची रांग लागली होती.