जिल्ह्यातील २६ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 07:57 PM2020-08-05T19:57:06+5:302020-08-05T20:06:28+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे सहा राज्यमार्ग तर वीस प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण २६ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

26 roads in the district closed; Alternative route resumes | जिल्ह्यातील २६ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

जिल्ह्यातील २६ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

Next
ठळक मुद्देपावसाने जिल्ह्यातील २६ मार्ग बंदपर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

कोल्हापूर : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ६ राज्यमार्ग व २० प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण २६ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.


करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर चिखली बाजारभोगाव राज्य मार्ग क्र. १९३ मार्गावरील करंजफेन गावाजवळ रस्त्यावर ४ फुट पाणी आल्याने तसेच पेंडाखळे, कांटे, बर्की, मौसम, पोहाळे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून पोहाळे-पोहळेवाडी मार्गाने व मलकापूर यळवण मांजरे अनुस्कुरा मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

चंदगड तालुक्यातील कोल्हापूर,परिते, गारगोटी, कोदाळी भेडशी ते राज्यमार्ग हद्द रा.मा. क्र. १८९ मार्गावरील चंदगड पुलावर २ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. चंदगड गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद असून शिरगाव हेरे मार्गे व शिरगाव हिंडगाव मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील कोल्हापूर,परिते, गारगोटी, गडहिंग्लज, कोदाळी भेडशी ते राज्यमार्ग हद्द रा.मा. क्र. १८९ मार्गावरील भडगाव पुलावर १.६ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. गडहिंग्लज, आजरा नेसरी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

चंदगड तालुक्यातील चंदगड, इब्राहिमपूर, आजरा, महागांव, हलकर्णी, खानापूर जिल्हा हद्दीपर्यंत रा.मा.क्र. 201 मार्गावरील इब्राहिमपूर पुलावर ३ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. रा.मा. १८० ते कनूर गवसे इब्राहिमपूर अडकूर प्रजिमा क्र. ६६ ते रा.मा. क्र. १८९ प्रजिमा मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

गडहिंग्लज तालुक्यातील चंदगड, इब्राहिमपूर, आजरा, महागांव, हलकर्णी, खानापूर जिल्हा हद्दीपर्यंत रा.मा.क्र. २०१ मार्गावरील उंबरवाडी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद. सुळे महागाव मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा कोल्हापूर पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी राज्य हद्दीपर्यंत राज्य मार्ग क्र. १७७ मार्गावरील मांडुकली गावाजवळील ओढ्यावर २ फूट पाणी व कोदे फाट्याजवळ २ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.

हातकणंगले तालुक्यातील गगनबावडा कोल्हापूर पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी राज्य हद्दीपर्यंत राज्य मार्ग क्र. १७७ मार्गावरील एतवडे गावाजवळ पुलावर पाणी आल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे.

चंदगड तालुक्यातील शिरगांव नागनवाडी तडशिनहाळ रा.मा.क्र. १८० मार्गावरील दाटे गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे व कानूर खुर्द पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. आमरोली सोनारवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

आजरा तालुक्यातील नवले देवकांडगाव, साळगाव प्रजिमा ५८ वरील साळगाव बंधाऱ्यावर ३ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. सोहाळे बाची मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला, बाचणी प्रजिमा क्र. ३७ मार्गावरील बाचणी बंधाऱ्यावर २ फूट पाणी आल्याने वाहतुक बंद. कसबा बीड घानवडे प्रजिमा २९ मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे,

चंदगड तालुक्यातील गुडवळे, खामदळे, हेरे सावर्डे, हलकर्णी प्रजिमा क्रं. ७१ मार्गावरील करंजगाव पुलावर २ फुट पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील निलजी, नूल, येणेचवंडी, नंदनवाड प्रजिमा 86 मार्गावरील किमी -0/750 वरील बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने निलजी, नूल मार्गे वाहतूक बंद. प्रजिमा 80 वरुन दुंडगे- जरळी- मुगळी- नुल मार्गे पर्यायी वाहतूक सुरु.

राधानगरी तालुक्यातील आरे, सडोली खालसा, राशीवडे ब्रु., शिरगाव प्रजिमा क्रं. 35 मार्गावरील शिरगाव बंधाऱ्यावर 2 फूट पाणी असल्याने वाहतूक बंद. तारळे व राशीवडे मार्गे पर्यायी वाहतूक सुरु.

पन्हाळा तालुक्यातील परखंदळे, आकुर्डे, हारपवडे, गवशी, धुंदवडे, जर्गी, गगनबावडा प्रजिमा क्रं. 39 मार्गावरील गोठे पुलावर 2 फुट पाणी आल्याने वाहतूक बंद. मल्हार पेठे, सुळे, कोदवडे प्रजिमा 26 मार्गे पर्यायी वाहतूक सुरु.

गगनबावडा तालुक्यातील शेनवडे, अंदूर, धुंदवडे, चौधरवाडी, म्हासुर्ली, कोते, चांदे, राशिवडे बु, परीते प्रजिमा क्रं. 34 मार्गावरील अंदूर बंधाऱ्यावर 2 फुट पाणी असल्याने अणदूर, मणदूर, वेतवडे, बालेवाडी प्रजिमा क्रं. 25 मार्गे वाहतूक सुरु.

गगनबावडा तालुक्यातील बाजार भोगाव, किसरूळ, काळजवडे पोंबरे कोलीक, पडसाळी ते काजीर्डा घाटास मिळणारा जिल्हा हद्दीपर्यंत प्रजिमा क्र. 19 मार्गावरील मनवाडा बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून कोल्हापूर चिखली पाडळी येवलुज बाजारभोगाव मार्गे पर्यायी वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा तालुक्यातील बाजार भोगाव, किसरूळ, काळजवडे पोंबरे कोलीक, पडसाळी ते काजीर्डा घाटास मिळणारा जिल्हा हद्दीपर्यंत प्रजिमा क्र. 19 मार्गावरील माणगाव बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. कोल्हापूर चिखली पाडळी येवलूज बाजारभोगाव मार्गे पर्यायी वाहतूक सुरु.

चंदगड तालुक्यातील राजगोळी, कुदनूर, कालकुंद्री, कागणी, किणी, नागरदळे, कडलगे, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, कारवे रामा क्र. 180 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र 65 मार्गावरील मोरीवर 2 फूट पाणी असल्याने वाहतूक बंद. प्रजिमा 65 ते ढोलगरवाडी, गोळवाडी ग्रा.मा. 34 मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

चंदगड तालुक्यातील राजगोळी कुदनूर कालकुंद्री कागणी किणी नागरदळे कडलगे ढोलगरवाडी मांडेदुर्ग कारवे रामा क्र. 180 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र 65 मार्गावरील तळगुली सी डी वर्क 1 फूट पाणी असल्याने वाहतूक बंद.कूदनूर पलावर 2 फूट पाणी असल्याने वाहतूक बंद. ढोल्गरवाडी सी डी वर्क वर 1-6 फूट पाणी असल्याने वाहतूक बंद. मांडे दुर्ग सी डी वर्क वर 2 फूट पाणी असल्याने वाहतूक बंद.

करवीर तालुक्यातील बालिंगे, महेपाटी, बीड, शिरोली, तारळे खुर्द, कसबा तारळे, पिरळ, पडळी, कारीवडे दिगस, ओळवण प्र. जि. मा 29 मार्गावरील शिरोली गावाजवळ मोरीवर पाणी असल्याने वाहतूक बंद असून शिरोली दुमाला, घानवडे हसुर दुमाला, सोनाळी ते चाफोडी मार्ग पर्यायी वाहतूक सुरू. महे पुलावर 4 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद. महे गावापर्यंची वाहतूक बालिंगा पाडळी व कसबा बीड करीता कुडीत्रे फॅक्टरी सांगरुळ मार्ग पर्यायी वाहतूक सुरू.

पन्हाळा तालुक्यातील कोपार्डे पडळ माजगाव पोर्ले प्र. जि. मा 18 मार्गावरील माजगाव पुलावर 2 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद. कळे पुनाळ दिगवडे प्रजिमा क्र. 17 मार्ग पर्यायी वाहतूक सुरू.

चंदगड तालुक्यातील पाटणेफाटा, माणगाव, शिवणगे, निट्टूर कोवाड प्र. जि. मा 67 मार्गावरील म्हाळेवाडी गावाजवळ पाणी निट्टुर गावाजवळ मोरीवर पाणी असल्याने वाहतूक बंद. कोवाड, ढोलकरवाडी, गौळवाडी मार्ग पर्यायी वाहतूक सुरू. माणगाव के टी वीयर 1 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद.

शाहूवाडी तालुक्यातील डोणोली, जवळून, चरण, सैदापूर, सावर्डे, सातवे, मोहरे, कोडोली प्र. जि. मा 6 मार्गावरील डोणोली गावाजवळ बंधाऱ्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद. थेरगाव, सातर्डे सातवे शिंदेवाडी व थेरगाव सावर्डे, सातवे मार्ग पर्यायी वाहतूक सुरू.

कागल तालुक्यातील बिद्री, सोनाळी, बस्तवडे प्र. जि. मा 45 मार्गावरील बस्तवडे बंधाऱ्यावर 3 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद. इजिमा क्र. 189 अनुर ते बानगे व इजिमा क्र. 93 बानगे मार्ग पर्यायी वाहतूक सुरू.

चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा, पाटणे मोटणवाडी प्र. जि. मा 77 मार्गावरील पाटणे पुलावर 2 फुट पाणी असल्याने वाहतुक बंद.

करवीर तालुक्यातील कुडित्रे, कोगे, महे, देवाळे, दिंडनेर्ली, नंदगाव प्र. क्र 28 मार्गावरील कोगे बंधाऱ्यावर 3 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद. कुडीत्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे करिता बालिंगा पाडळी कोगे मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

शाहूवाडी तालुक्यातील येळाणे, कोपार्डे, जवळून, शिरगांव, सौते, शिंपे, सुरुड ते सागाव जिल्हा हद्दीपर्यंत प्रजिमा क्रं. 4 मार्गावरील शिरगांव मठ ते सवतेमध्ये रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद. मलकापूर सावे बांबवडे सुरुड मार्ग पर्यायी वाहतूक सुरू.

कागल तालुक्यातील आलाबाद, दौलतवाडी, मुरगुड प्रजिका क्रं 50 मार्गावरील सर पिराजीराव तलावतील पाणी असल्याने वाहतूक बंद. हासुर बोळावी ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगड मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

गडहिंग्लज तालुक्यातील जरळी, दुंडगे, हासूचंपू ते राज्य हद्दीपर्यंत प्रजिमा 80 मार्गावरील जरळी बंधाऱ्यावर 2 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद. गडहिंग्लज, आजरा, नेसरी, महागाव मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी, बसर्गे प्रजिमा 57 मार्गावरील हलकर्णी ूं४२ी ६ं८ वर 9 इंच पाणी असल्याने वाहतूक बंद. बसरगे येणेचवंडी, नंदनवाड, हलकर्णी मार्ग पर्यायी वाहतूक सुरू.



 

Web Title: 26 roads in the district closed; Alternative route resumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.