२५ हजार चात्याचा प्रकल्प सुरू करणार : अशोकराव माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:31+5:302021-03-24T04:22:31+5:30
शिरोळ : कोरोना काळातही संस्थेने अत्यंत काटकसरीचे धोरण अवलंबून शासनाचे कर्जाचे हप्ते वेळेवर परतफेड करण्याचे काम सुरू असून, संस्था ...

२५ हजार चात्याचा प्रकल्प सुरू करणार : अशोकराव माने
शिरोळ : कोरोना काळातही संस्थेने अत्यंत काटकसरीचे धोरण अवलंबून शासनाचे कर्जाचे हप्ते वेळेवर परतफेड करण्याचे काम सुरू असून, संस्था नफ्यात आणली आहे. येत्या वर्षभराच्या आत दे.भ. रत्नाप्पाणा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीमध्ये २५ हजार चात्या उभारून पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू करणार आहे, अशी ग्वाही अध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी दिली.
तमदलगे (ता. शिरोळ) येथे दे.भ. रत्नाप्पाणा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची २८ वी वार्षिक ऑनलाइन सभा पार पडली. स्वागत उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन कार्यलक्षी संचालक दिलीप काळे यांनी केले. यावेळी सुरेश सासणे, रजत पवार यांचा अशोकराव माने यांच्या हस्ते सत्कार झाला.
सभेस वसंत कांबळे, चिंतामणी निर्मळे, नानासाहेब राजमाने, अमर धुमाळ, बाबासो मिसाळ, विलास माने, डॉ. अरविंद माने, जितेंद्र चोकाककर, बबन बन्ने, रेखादेवी माने, इंदुमती माने, जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, संदीप कारंडे, सुहास राजमाने, संभाजीराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जी. आर. माने यांनी केले. धनंजय टारे यांनी आभार मानले.
फोटो - २३०३२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - तमदलगे (ता. शिरोळ) येथे दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीत डॉ. अशोकराव माने यांनी मार्गदर्शन केले.