शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेले ३० लाख किमतीचे २५० मोबाईल पुन्हा मूळ मालकांना परत

By सचिन भोसले | Updated: December 9, 2023 00:51 IST

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत मोबाईल संच हरविल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या.

कोल्हापूर : कष्टाच्या पैशातून हजारो रुपये घालून खरेदी केलेला मोबाईल जेव्हा हरवतो किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरी झाला की आपण हताश होवून तो परत मिळेल ही आशा सोडून देतो. औपचारिकता म्हणून पोलिसांत तक्रार नोंदविली जाते. मात्र, अशाच दाखल झालेल्या तक्रारीचा छडा लावून सायबर पोलिस ठाणेच्या पथकाने ३० लाख किंमतीचे अडीचशे मोबाईल शोधून ते शुक्रवारी पुन्हा मुळ मालकांना परत दिले.जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत मोबाईल संच हरविल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या. त्या तक्रारीतील आयएमईआय एकत्रित करून सायबर पोलिस ठाणेच्या पथकाने संबधित  मोबाईल कंपनीशी संर्पक साधला. त्यांचा सीईआयआर पोर्टलचा वापर करून हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यानूसार सायबर ला सुचना दिल्या. त्यांच्या सूचनेनूसार पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पथकांची नेमणुक केली. या पथकांनी कर्नाटक, हैदराबाद , गोवा, कोकण, पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून हे गहाळ आणि चोरी झालेले तब्बल २५० आणि ३० लाख किमतीचे मोबाईल शोधून काढले. परत मिळवलेले मोबाईल विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते व  जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत गुरुवारी  मुळ मालकांना परत दिले. नागरीकांना काडीमात्र अपेक्षा नसताना ते मोबाईल मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता.यांच्या सातत्यपुर्ण कामगिरीचे फळजिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनूसार अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, अतिष म्हेत्रे , अंमलदार सागर माळवे, महादेव गुरव, अमर वासुदेव, रविंद्र पाटील, सचिन बेंडखळे, प्रदीप पावरा, अजय सावंत, विनायक बाबर,सुरेश राठोड, दिलीप पोवार, रविंद्र गाडेकर, विशाल पाटील, सुहास पाटील, विक्रम पाटील, संगीता खोत, रेणूका जाधव गेले वर्षभरापासून सातत्याने परिश्रम घेवून हे मोबाईल शोधून काढले आहेत. जास्तीत जास्त नागरीकांना ओळख पटवून परत देण्याच्या सुचनामोबाईल आयएमईआय क्रमांक व कागदपत्रांची ओळख पटवून जास्तीत जास्त नागरीकांना मिळालेले मोबाईल परत देण्यात आले. यासाठी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त मोबाईल परत द्यावेत. अशा सुचना विशेष पोलिस निरीक्षक सुनील फुलारी यांनी सायबर च्या पथकाला दिल्या. 

टॅग्स :MobileमोबाइलPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर