शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कणबरकर कुटुंबीयांची विद्यापीठाला २५ लाख देणगी

By admin | Updated: September 4, 2015 23:10 IST

शिक्षकाची अनोखी कृतज्ञता : उत्कृष्ट कामाबद्दल करणार गौरव

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजी विद्यापीठाला २५ लाख रुपयांच्या ठेवीसाठी शुक्रवारी धनादेश प्रदान केला. कणबरकर यांच्या पत्नी शालिनी यांनी या ठेवीसाठीचा धनादेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या १३ एप्रिल या स्मृतिदिनी या रक्कमेतून दरवर्षी पुरस्कार देण्यात येईल. एक लाख ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असेल. एका हाडाच्या शिक्षकाच्या कुटुंबियांनी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाप्रती वेगळी कृतज्ञता जपली.कुलगुरू डॉ. शिंदे यांनी गुरुवारी (दि. ३) प्राचार्य कणबरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. कणबरकर सरांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. प्राचार्य कणबरकर यांचे चिरंजीव डॉ. अरुण यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ‘बीसीयूडी’चे संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, इचलकरंजीच्या व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत, प्राचार्य कणबरकर यांच्या कन्या डॉ. अंजली साबळे, मेघा वागळे, डॉ. नमिता खोत उपस्थित होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार’ या निधीतून देण्यात येईल. त्यासाठी विद्यापीठाशी केलेल्या सामंजस्य कराराला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. पुरस्कारार्र्थीच्या निवडीसाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय विशेष शोध समिती स्थापन करण्यात येणार आहे. कुलसचिव या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव असतील. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत हे सदस्य असतील. (प्रतिनिधी)शिवाजी विद्यापीठासह ज्या-ज्या शैक्षणिक संस्थांनी आपले आयुष्य घडविण्यात मोलाचे योगदान दिले, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची कणबरकर सरांची इच्छा होती. तिच्या पूर्ततेचे पहिले पाऊल म्हणून पुरस्कार देण्याचा निर्णय आम्ही निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठाला २५ लाखांचा निधी सुपूर्द केला आहे. या पुरस्कारातून सरांचे नाव राहील. शिवाय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहनदेखील मिळेल.- श्रीमती शालिनी कणबरकर, पत्नीराज्यात प्रथमचशिक्षक म्हणजे नुसते घेणारा अशी प्रतिमा समाजात ठळक होत असताना एखाद्या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून एवढा मोठा निधी विद्यापीठास देण्याची हा राज्यातील पहिलाच प्रसंग असावा. या माध्यमातून कणबरकर सरांच्या स्मृती चिरंतन दरवळत राहतील, अशा भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केल्या.