शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अडीच कोटींचे कांदा अनुदान जमा, कोल्हापूर बाजार समितीची यंत्रणा सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 6:20 PM

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीशी संलग्न ३९७७ शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून २ कोटी ५९ लाख रुपयांचे कांदा अनुदान मंजूर झाले आहे. ही रक्कम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आली असून, दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. त्यासाठी बाजार समितीची यंत्रणा सक्रिय झाली आहे.

ठळक मुद्देअडीच कोटींचे कांदा अनुदान जमा, कोल्हापूर बाजार समितीची यंत्रणा सक्रिय दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीशी संलग्न ३९७७ शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून २ कोटी ५९ लाख रुपयांचे कांदा अनुदान मंजूर झाले आहे. ही रक्कम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आली असून, दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. त्यासाठी बाजार समितीची यंत्रणा सक्रिय झाली आहे.नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत कांद्याच्या दरात एकदम घसरण झाली होती. घाऊक बाजारात दीड-दोन रुपये प्रतिकिलोने शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करावी लागल्याने मोठे नुकसान झाले होते. सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून घेतले. कोल्हापूर बाजार समितीमध्ये पहिल्या टप्प्यात ४००४ अर्ज आले होते. या अर्जांची सरकारच्या निकषांप्रमाणे छाननी करण्यात आली. त्यातील २७ शेतकरी अपात्र ठरले. पात्र ३९७७ शेतकऱ्यांचे अर्ज अनुदान मागणीसाठी सरकारकडे पाठविले होते. या शेतकऱ्यांना २ कोटी ५९ लाख ३ हजार ८०० रुपये अनुदान मंजूर झाले आहे.जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे हे अनुदान आले असून, त्यांची शेतकरीनिहाय छाननी करून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात १०५१ अर्जराज्य सरकारने १५ डिसेंबरपर्यंत अनुदान योजना जाहीर केली होती; पण या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी झाल्यानंतर सरकारने त्यास मुदतवाढ दिली. जानेवारीअखेर १०५१ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी होऊन ते अनुदानासाठी पाठविले जाणार आहेत. 

 

टॅग्स :onionकांदाkolhapurकोल्हापूर