शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटअभावी २२१ दुचाकीचालकांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 16:41 IST

bike, accident, police, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत एकूण ४९२ अपघात घडले. त्यांमधील ४०० हून अधिक दुचाकी अपघातांत २२१ चालकांचा मृत्यू झाला. पैकी ९५ टक्के दुचाकी अपघातांत चालकाच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात १० महिन्यांत ४०० हून अधिक दुचाकी अपघात हेल्मेटविना ९५ टक्के वाहनचालकांचा मृत्यू

तानाजी पोवारकोल्हापूर : हेल्मेट असते तर...!!! पण हा विचार दुर्घटनेनंतरच मनात येतो. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते अन‌् अपघातात जीव गमावलेला असतो. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत एकूण ४९२ अपघात घडले. त्यांमधील ४०० हून अधिक दुचाकी अपघातांत २२१ चालकांचा मृत्यू झाला. पैकी ९५ टक्के दुचाकी अपघातांत चालकाच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.डोक्याला हेल्मेट न घालता बहुतांश दुचाकीस्वार प्रवास करतात. दुचाकीचालकांनी व मागे बसलेल्या व्यक्तीने डोक्याला हेल्मेट घालणे कायद्याने सक्तीचे आहेच; पण त्याची तितक्या तीव्रतेने अंमलबजावणी होत नाही. वाहनचालकांनाही त्याचे गांभीर्य वाटत नाही.कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या प्रत्येक दुर्घटनेत डोक्याला गंभीर दुखापत होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. कदाचित त्यांच्या डोक्याला हेल्मेट असते तर अपघातात ते जखमी झाले असते; पण त्यांच्यावर मृत्यूचे प्रसंग ओढवले नसते, असे दिसते.महामार्गांवर अपघातांची मोठी संख्यापुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गासह कोल्हापुरातून कोकणला जोडणारे तीन राज्य महामार्ग आहेत. या मार्गांवरही दुचाकीचालकांची मोठी वर्दळ आहे. या मार्गांवर दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे असले तरीही त्याकडे पोलीस अथवा वाहनचालकांकडून गांभीर्याने पाहिले जात नाही; त्यामुळे या मार्गांवरच मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारांचे अपघात होतात.

हेल्मेट नसल्यामुळे वाहन दुर्घटनेत बहुतांश २५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे बळी गेलेल्यांची संख्या मोठी आहे, हेल्मेट न वापरणे म्हणजे आत्महत्या करण्याचाच प्रकार आहे. अपघातात अपंगत्व आले तरी केवळ हेल्मेट वापरल्याने डोके व जीवही सुरक्षित राहतो.- डॉ. वीरेंद्रसिंह पोवार, न्यूरो सर्जन, कोल्हापूर

टॅग्स :AccidentअपघातbikeबाईकPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर