शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

‘महाद्वार’ला २२ फुटी तोरण

By admin | Updated: July 22, 2015 00:39 IST

आजपासून धार्मिक विधी : उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या प्रारंभानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीने महाद्वार कमानीला २२ फुटी तोरण बांधण्यात आले. आज, बुधवारपासून महापूजेने मूर्तीवरील धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. अंबाबाई मूर्तीवर उद्या, गुरुवारपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. पुरातत्त्व खात्याचे अधिकारी तब्बल सोळा दिवस मूर्ती संवर्धनाचे काम करणार आहेत. याच कालावधीत हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीने त्या अनुषंगाने महत्त्वाचे धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात करताना त्याचे प्रतीक म्हणून तोरण बांधण्याची पद्धत आहे. रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या प्रारंभाचा भाग म्हणून मंगळवारी संध्याकाळी महाद्वार कमानीला तोरण बांधण्यात आले. यावेळी श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर, आशुतोष ठाणेकर, केदार मुनीश्वर उपस्थित होते. सुबोध बापट यांनी नियोजन केले. इतरवेळी बनविले जाणारे तोरण हे कागदाचे असते. मात्र, महाद्वार कमानीला बांधण्यात आलेले २१ फुटी तोरण प्लायवूडपासून बनविण्यात आले आहे. त्याच्या मध्यभागी गणपतीची प्रतिकृती आहे. तोरणाला ११ नारळ आणि १७ पाने लावण्यात आली आहेत. रमेश माळकर यांनी अवघ्या दोन दिवसांत हे तोरण तयार केले आहे. अंबाबाईच्या कार्यासाठी आम्हाला तोरण बनविण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया माळकर यांनी दिली. सकाळी साडेदहा वाजता धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. आज आणि उद्या (गुरुवार) दोन दिवस अंबाबाई मूर्तीमधील प्राणतत्त्व कलशात घेण्याचा विधी होईल. गुरुवारी मूर्ती पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द होईल.