शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडात नोकरी देण्याचा फंडा, २.१९ लाखांचा ऑनलाईन गंडा; बँक खाते हॅक करुन रक्कम लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 13:25 IST

संशयित हॅकर्सने त्यांच्या जॉइंट बॅक खात्यावरील २ लाख १९ हजार रुपये ऑनलाइन दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले

कोल्हापूर : कॅनडा येथे भरघोस पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून बँक खाते हॅक करून त्यावरील रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करून एकाला सुमारे २ लाख १९ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. याबाबत फसवणूक झालेले आकाश अजित गोटडकी (वय ४३, रा. रिंगरोड, राजेंद्रनगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत राज जैन व मनोज पटेल (रा. ग्राऊंड फ्लोअर, गाला हाऊस कर्टर रोड, बोरीवली, ईस्ट मुंबई) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाश गोटडकी हे मार्केटिंगचा व्यवसाय करतात. त्यांना नोकरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे संशयित राज जैन नामक व्यक्तीने आपल्या मोबाइल नंबरच्या व्हॉट्सॲपवरून फिर्यादी गोटडकी यांच्या व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. कॅनडामध्ये जॉब असल्याची बतावणी केली. त्याकरिता एका बँकेत वैयक्तिक खाते तसेच पत्नीसोबत आणखी एक जॉइंट खाते उघडण्यास भाग पाडले.जॉबसाठी जाॅइंट खात्यावर २ लाख २० हजार रुपये भरण्यास लावले. फिर्यादी यांनी पैसे भरल्यानंतर संशयितांनी त्याचा विश्वास संपादन केला. संशयिताने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचे डेबिट कार्ड व त्याचा पिन कोड नंबर घेतला. त्यानंतर फिर्यादी गोटडकी यांच्या अपरोक्ष त्यांचे जाॅइंट खाते संशयिताने हॅक केले. तसेच फिर्यादी व त्यांच्या पत्नींना मोबाइल चार तास बंद ठेवण्यास सांगितले.या वेळेच संशयित हॅकर्सने त्यांच्या जॉइंट बॅक खात्यावरील २ लाख १९ हजार रुपये ऑनलाइन दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. ही घटना दि. १५ ते ३१ जुलै दरम्यान घडली. जॉइंट खात्यावरील रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच गोटडकी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी