उल्लेखनीय कर्तृत्वाबद्दल २१ अधिकारी, पोलिसांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST2021-02-05T07:10:30+5:302021-02-05T07:10:30+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा ...

21 officers, police felicitated for outstanding performance | उल्लेखनीय कर्तृत्वाबद्दल २१ अधिकारी, पोलिसांचा सत्कार

उल्लेखनीय कर्तृत्वाबद्दल २१ अधिकारी, पोलिसांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व उल्लेखनीय कर्तृत्वाबद्दल २१ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले (स्थानिक गुन्हे अन्वेषण), सहायक फौजदार राजेंद्र उगलमुगले (कुरुंदवाड), सहायक फौजदार गजानन सिद (शिवाजीनगर), पो.कॉ. नामदेव यादव, राजेश आडूळकर, अनिल पास्ते, सुजय दावणे (सर्व स्थानिक गुन्हे अन्वेषण, कोल्हापूर), महेश कोरे (स्थानिक गुन्हे अन्वेषण, इचलकरंजी), मंजूनाथ बेळमकर (राधानगरी), बाळकृष्ण सूर्यवंशी, शमशुद्दीन पठाण, विनायक चौगुले (तिघेही एसआयटी), विजया सांबरेकर, बशीर सनदी (दोघेही नियंत्रण कक्ष), प्रदीप शिंदे (जि.वि. शा.), हेमंत कोरोशी (कुरुंदवाड), प्रकाश पाटील (एसआयटी), शिवाजी पाटील (जुना राजवाडा), मंजुरामण मुल्ला (विमानतळ सुरक्षा), मदन मधाळे (शिरोळ) यांचा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

फोटो नं. २७०१२०२१-कोल-पोलीस०१

ओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पो. नि. तानाजी सावंत यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

फोटो नं. २७०१२०२१-कोल-पोलीस०२

ओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Web Title: 21 officers, police felicitated for outstanding performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.