अरुण काशीदइचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून शहराचे नेतृत्व करण्यासाठी उभे राहिलेल्या अनेक उमेदवारांची कौटुंबिक संपत्तीची उड्डाणे कोटीच्या घरात आहेत. त्यातील चर्चेतील २१ जण करोडपती आहेत. संजय महादेव कांबळे यांच्या कुटुंबाची सर्वाधिक ३२ कोटी रुपये संपत्ती आहे, तर सदाशिव अण्णाप्पा मलाबादे यांच्या संपत्तीचे विवरण निरंक आहे.निवडणुकीस उभे राहणाऱ्या उमेदवारास संपत्तीचे सविस्तर विवरण द्यावे लागते. त्यामध्ये शेती, अकृषक जमीन, व्यापार, निवासी गाळे, घर, देणगी, इतर उत्पन्न, दागिने, विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक, वित्तीय कंपन्या पोस्ट ऑफिस, एलआयसी, बचत पत्र, बक्षीसपत्र, आदींचा समावेश आहे. उमेदवारांनी संपत्तीच्या तपशिलाचा घोषवारा आपल्या शपथपत्रात दिला आहे.
वाचा : इचलकरंजी महापालिकेवर कोल्हापूर व्हाया मुंबईचे लक्षयामध्ये प्रभाग क्रमांक १२ अ मधून निवडणुकीस उभे राहिलेले कांबळे यांनी सर्वाधिक संपत्ती दाखवलेली आहे, तर सामाजिक कार्य करणारे व प्रभाग १० ड मधून निवडणुकीच्या रिंगणात असलेले मलाबादे यांनी आपल्या एकूण मालमत्तेच्या विवरणामध्ये निरंक लिहिले आहे. त्यांच्या नावावर ना घर आहे, ना पासबुकात बॅलेन्स. जे उमेदवार चर्चेत आहेत, त्यातील सर्वांची संपत्ती कोटीच्या घरातच आहे. काहींची संपत्ती स्वत:च्या नावावर, तर काहींची पत्नी, कुटुंबीयांच्या नावावर आहे. याची सविस्तर माहिती घोषणापत्रात दिली आहे.
वाचा: सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार
चर्चेतील उमेदवार आणि त्यांचे उत्पन्नसंजय महादेव कांबळे - ३२ कोटी १७ लाख ७२ हजार २७०.अशोक रामचंद्र जांभळे - १८ कोटी ४१ हजार ७२३.राजू शंकर चव्हाण - १५ कोटी ८३ लाख ६५ हजार ८८७.मदत सीताराम कारंडे - १३ कोटी ८६ लाख ९९ हजार ३१.अनिलकुमार देवकरण डालिया (डाळ्या) - १२ कोटी ३३ लाख ६८ हजार २९५.सुरेखा अजित जाधव - ८ कोटी ९३ लाख ९१ हजार ७२१.सुहास अशोकराव जांभळे - ७ कोटी ७७ लाख २४ हजार २९५.विजया सुनील महाजन - ६ कोटी ८५ लाख ९० हजार ४६५.अब्राहम किसन आवळे - ६ कोटी २२ लाख ७३ हजार ३००.संजय शंकरराव तेलनाडे - ५ कोटी ८४ लाख २३ हजार ७२२.उदय आनंदा धातुंडे - ४ कोटी ५६ लाख ७० हजार ५९१.रणजित दिलीप लायकर - ४ कोटी ११ लाख २७ हजार ९६.मेघा दादासो भाटले - ३ कोटी ३२ लाख ३६ हजार ४३१.संतोष महावीर जैन - २ कोटी ९६ लाख ७१ हजार ५८२.अभिषेक रमाकांत वाळवेकर - २ कोटी ८१ लाख ४३५.अलका अशोक स्वामी - २ कोटी ७६ लाख १२ हजार ६८६.ध्रुवती सदानंद दळवाई - २ कोटी २८ लाख ४२ हजार ११.
Web Summary : Ichalkaranji municipal elections see 21 millionaire candidates. Sanjay Kamble's family leads with ₹32 crore assets. Sadashiv Malabade declares nil assets. Wealth details are self-declared.
Web Summary : इचलकरंजी नगर निगम चुनाव में 21 करोड़पति उम्मीदवार हैं। संजय कांबले का परिवार ₹32 करोड़ की संपत्ति के साथ सबसे आगे है। सदाशिव मालाबादे ने शून्य संपत्ति घोषित की। संपत्ति विवरण स्व-घोषित हैं।