शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! राज्यात पावणे दोन हजार मुली तस्करीच्या जाळ्यात, रुपाली चाकणकरांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 13:18 IST

पालकांची सर्वाधिक जबाबदारी असून त्यांनी मुलींशी संवाद साधणे गरजेचे

कोल्हापूर : राज्य महिला आयोगाच्या अहवालानुसार राज्यातील १६ ते २२ वयोगटातील तब्बल पावणेदोन हजार मुली व महिला गायब असून त्या परदेशात मानवी तस्करी व अवैध कामात ओढल्या गेल्या आहेत. हे प्रमाण अतिशय धक्कादायक असून यातील २७ मुलींना महाराष्ट्रात परत आणण्यात आयोगाला यश आले आहे. पालकांची सर्वाधिक जबाबदारी असून त्यांनी मुलींशी संवाद साधणे गरजेचे आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, कोविडनंतर मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले असून मोबाइलमुळे अजाणत्या वयात वाढलेले प्रेमसंबंध आणि कुटुंबाची आर्थिक विवंचना ही महत्त्वाची दोन कारणे आहेत. अनेक मुली ओमान, मस्कत सारख्या परदेशात असून त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.बालविवाह रोखण्यासाठी पुढील २ दिवसातच पत्र पाठवून कार्यालये, समाज मंदिर अशा ठिकाणी विवाहासाठी हॉल देताना संबंधितांनी मुलीच्या वयाचा दाखला मागणे बंधनकारक केले जाणार आहे. तसेच बालविवाह करणारे वधू-वर कुटुंबीय व संबंधित सर्व घटकांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना दिली आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी धाडी टाकण्यात येतील.

२ हजार खासगी आस्थापनांमध्ये तक्रारीची सोय नाहीचाकणकर म्हणाल्या, जिल्ह्यातील २८३ पैकी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती आहे. पण २ हजार ५६६ खासगी आस्थापनांपैकी फक्त ५६८ आस्थापनांमध्ये तक्रार निवारण समिती आहे.

५ ते ७ तारखेदरम्यान तपासणीजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोगाचे सदस्य, सामाजिक संस्था व कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांना भेटी देऊन तेथील महिलांच्या तक्रारी, त्यांच्याबाबत घडणारे गुन्हे व प्रत्यक्ष कार्यवाही याची माहिती घेणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRupali Chakankarरुपाली चाकणकरWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी