शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

कोल्हापुरातील गावठाण वाढीचा मोठा अडसर दूर, दोनशे मीटरचे क्षेत्र बिगरशेती; पालकमंत्र्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:18 IST

१ नोव्हेंबरपर्यंत रेखांकन होणार : तुकडेबंदी कायदा रद्द, 

कोल्हापूर : गाव, नगरपालिका, महापालिकेच्या मूळ हद्दीपासून २०० मीटरचे रेखांकन पूर्ण करून त्याबाबतची स्पष्टता १ नोव्हेंबरपूर्वी द्यावी, असे निर्देश भूमी अभिलेख विभागाला दिले असून, यामुळे गावठाण वाढीचा अडसूर दूर होऊन नागरिकांची बांधकाम परवान्यासह इतर अडचणींपासून सुटका होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री आबिटकर म्हणाले, बिगरशेती जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला असून, शहरी भागात एक गुंठ्यापर्यंतच्या जमिनींचे लहान तुकडे खरेदी-विक्रीसाठी कायदेशीररित्या ग्राह्य ठरतील. अशा प्रकारच्या खरेदीच्या दस्त नोंदणीसाठी तलाठी जाणीवपूर्वक विलंब करत असतील तर थेट जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांच्या कामांची चौकशी होणार असून, यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर ते गगनबावडा महामार्गाबाबत अनेक तक्रारी आहेत. त्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे.वनहक्क दावे निकालात काढणारप्रातांधिकाऱ्यांच्या पातळीवर वनहक्क दावे प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा वन अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम दिला असून, प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेऊन संपूर्ण प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

हमीभाव केंद्रांची संख्या वाढवणारजिल्ह्यात हमीभाव केंद्रांना शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. भाताला २३६९, नाचणीला ४८८६, सोयाबीनला ५३२८ रुपये आधारभूत किंमत आहे. मात्र, त्यापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी होते. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवणार आहे. त्याबाबत ‘पणन’ विभागाला सूचना दिल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

‘देवस्थान’ला जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्ष मिळेल

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला यापूर्वीच अध्यक्ष मिळायला हवा होता. मात्र, काही अडचणीमुळे हा निर्णय होऊ शकला नसला तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीनंतर ‘देवस्थान’ला अध्यक्ष मिळेल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.गायरानवरील घरांबाबत सकारात्मक निर्णयगायरान जमिनी सार्वजनिक वापराशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी देऊ नयेत, असे आदेश २००४ साली सर्वोच्च न्यायालयाने दिले. राज्य शासनाने २०१३ पूर्वीची गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुलित करण्याबाबत निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयाने ही अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश दिले. पण, राज्य शासनाचे न्यायालयीन पातळीवर प्रयत्न सुरू असून, याबाबतही सकारात्मक निर्णय होईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

पालकमंत्री काय म्हणाले 

  • अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.
  • अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील कामांना गती देणार.
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Gaothan Expansion Obstacle Removed; 200-Meter Area Non-Agricultural

Web Summary : Kolhapur's Gaothan expansion faces smooth path as 200-meter area is now non-agricultural. Land division law amended, benefiting small land transactions. Road work inquiries initiated, and pending forest rights claims to be resolved promptly. More crop procurement centers will be established.