शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

शिवाजी विद्यापीठात २४७ नवे अभ्यासक्रम सुरू होणार; सुधारित आराखडा मंजूर  

By संदीप आडनाईक | Updated: May 25, 2023 19:16 IST

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली शाहू सभागृहात ही बैठक झाली.

कोल्हापूर : जिल्हा स्तरावर लोककला महाविद्यालय, पदव्युत्तर डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी, शारिरीक शिक्षण महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ हार्टिकल्चर अन्ड स्पायसेस, शुगर इन्स्टिट्यूट, तालुकास्तरावर क्रीडा, विधी, एकात्मिक शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, कला, वाणिज्य, विज्ञान रात्र महाविदयालये व कौशल्यावर आधारित २४७ नव्या अभ्यासक्रमांचा पाच वर्षांच्या बृहत आराखड्यात समावेश असून गुरुवारी झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत त्यास मंजुरी देण्यात आली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली शाहू सभागृहात ही बैठक झाली.

विद्यापीठाचा २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांचा सुधारित बृहत आराखडा अधिसभेच्या विशेष बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. याच बैठकीत १० मार्चला झालेल्या अधिसभेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत कायम करण्यात आला. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील ५९ वा मराठी वार्षिक अहवालही मंजूर करण्यात आला. कुलगुरु डॉ. शिर्के म्हणाले, आटपाडी, राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्याच्या ठिकाणांचा नव्याने सॅटेलाईट सेंटर सुरू होतील. सिनेमा, नाटक, इतर कला, संगीत यांचा समावेश असलेले स्कूल ऑफ फाईन आर्टस येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा मानस आहे. ललित कला महाविद्यालयाचाही बिंदू या आराखड्यात आहे. आराखडा पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

यावेळी अधिसभेसमोर प्रकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीतील वृतांत व विषयनिहाय झालेल्या चर्चेतील मुद्दे मांडले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील यांनी बृहत आराखडा सभागृहासमोर सादर केला. त्यात त्यांनी संबंधित आराखडा तयार करण्यासाठी राबविलेली प्रक्रिया, नवीन अभ्यासक्रम, विद्याशाखा, महाविद्यालये आदींची माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत अधिसभा सभागृहाने व्यवस्थापन परिषदेच्या सुधारित शिफारशीनुसार विद्यापरिषदेची सुधारित शिफारस विचारार्थ घेउन या पंचवार्षिक बृहत आराखड्यास मान्यता देण्यात आली.

विद्यापीठाचा २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील ५९ वा मराठी वार्षिक अहवालही मंजूर करण्यात आला. हा अहवाल डॉ. रघुनाथ ढमकले यांनी सादर केला. बृहत आराखड्याबाबत अधिसभा सदस्य विष्णू खाडे, संजय परमणे, श्रीनिवास गायकवाड, श्वेता परूळेकर, डी. एन. पाटील, डॉ. मनोज पाटील, ज्ञानदेव काळे, अभिषेक मिठारी, अमित कुलकर्णी, अमरसिंह राजपूत, डॉ. रघुनाथ ढमकले आदींनी आक्षेप, सूचना आणि तक्रारी मांडल्या. बैठकीस चंदगडचे आमदार राजेश पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजयसिंग जाधव, संलग्नता विभागाचे उपकुलसचिव डॉ. विलास सोयम आदी उपस्थित होते.

'सभात्याग' वरून सदस्य आक्रमकमागील अधिसभा सभेत अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतर काही सदस्यांनी काही काळासाठी या कृत्याचा निषेध करत सभात्याग केला होता. त्याचा उल्लेख व्हावा अशी सुधारणा ॲड. अभिषेक मिठारी आणि ॲड. अजित पाटील या सदस्यांनी दिली होती पण प्रशासनाने "काही सदस्य सभागृहाबाहेर जाऊन आले" असा बदल करुन "सभात्याग" शब्द वगळला. त्यामुळे राज्यपालांपर्यंत खरी माहिती न देता ती दडपण्याचा हा प्रयत्न असल्याने प्रारंभी अधिसभेत काही सदस्य आक्रमक झाले. त्यावर कुलगुरूंनी कायदेशीर तरतुदी पाहून निर्णय घेण्याचे जाहीर केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ