रविवारी १९ हजार जण देणार संयुक्त पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:23+5:302021-04-06T04:23:23+5:30
कोल्हापूर : तीनवेळा लांबणीवर पडलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रिय गट ब संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (दि. ११) महाराष्ट्र लोकसेवा ...

रविवारी १९ हजार जण देणार संयुक्त पूर्व परीक्षा
कोल्हापूर : तीनवेळा लांबणीवर पडलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रिय गट ब संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (दि. ११) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ५८ उपकेंद्रांवर ही परीक्षा देण्यासाठी १९,७७६ जणांनी नोंदणी केली आहे.
पीएसआय, विक्रीकर निरीक्षक, मंत्रालयीन सहाय्यक या पदांसाठी ही संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, डीआरके कॉमर्स, केएमसी कॉलेज, केआयटी कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल, आदी ५८ उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन तास अगोदर (सकाळी सात वाजता) परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांचे मूळ ओळखपत्र (आधारकार्ड/पॅन क्रमांक/फोटो) आणि प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणायचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उमेदवारांनी मास्क वापरणे आणि सॅनिटायझर जवळ ठेवणे अनिवार्य असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिली.