शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हद्दवाढ विरोधात १९ गावे उद्या राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 17:07 IST

उचगाव : सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी समितीतर्फे १९ गावांनी ग्रामरक्षणासाठी एकजुटीची वज्रमूठ उगारली असून, त्याचाच एक भाग म्हणून या ...

उचगाव : सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी समितीतर्फे १९ गावांनी ग्रामरक्षणासाठी एकजुटीची वज्रमूठ उगारली असून, त्याचाच एक भाग म्हणून या गावांमध्ये उद्या, रविवारी (दि. १४ जुलै) कडकडीत बंद पुकारला आहे.कोल्हापूरच्या हद्दवाढीत पहिल्या टप्प्यात शहराशेजारील काही गावे घेण्याचे नियोजन असल्याचे वृत्त आल्यानंतर उचगाव ग्रामपंचायत येथे बुधवारी (दि. १० जुलै) एल्गार सभा घेण्यात आली. या सभेला १९ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी, महिला उपस्थित होते. सर्वांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हद्दवाढीला विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला होता.या गावात कडकडीत बंदउचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, शिरोली, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे (कळंबा) या गावासह गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, कंदलगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, वळीवडे, नागाव, शिये, वडणगे, आंबेवाडी, नवे बालिंगा, नागदेववाडी, वाडीपीर, शिंगणापूर, पिरवाडी, शिरोली आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसी.गावागावांत फलक, शांततेचे आवाहनप्रत्येक गावातील चौकात हद्दवाढविरोधात भव्य डिजिटल फलक लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण गावे शांततेत बंद पाळणार आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही ठेवला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास होत आहे. १९ गावांनी शांततेत गाव बंद पाळावा. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. - मधुकर चव्हाण (सरपंच) अध्यक्ष, सर्व पक्षीय हद्दवाढ विरोधी समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूर