शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
2
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
4
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
5
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
6
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
7
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
8
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
9
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
10
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
11
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
12
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
13
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
14
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
15
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
16
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
17
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
18
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
19
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
20
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतींसाठी शक्तिप्रदर्शनाने १८६७ अर्ज दाखल, आज छाननी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:51 IST

Local Body Election: नगराध्यक्ष पदासाठी किती अर्ज दाखल...

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींसाठी अखेरच्या दिवशी सोमवारी सदस्यपदासाठी ६४१ इतक्या तर नगराध्यक्ष पदासाठी ७३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवसापर्यंत २६३ सदस्यांसाठी १ हजार ८६७ इतक्या जणांनी तर १३ नगराध्यक्षांसाठी १६९ जणांनी अर्ज दाखल केले.आज, मंगळवारी अर्जांची छाननी असून पात्र उमेदवारांना शुक्रवारी २१ तारखेपर्यंत माघार घेता येईल. जागांच्या तुलनेत दाखल झालेले अर्जांचे प्रमाण पाहता एका जागेसाठी सरासरी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. गडहिंग्लज आणि हातकणंगले येथे नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज भरला आहे. एका नगराध्यक्षपदासाठी सरासरी १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील १० नगरपालिका व ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीत सदस्यपदासाठी व अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात अर्ज दाखल होण्याचे प्रमाण कमी होते. पण, दिवस संपत आले तसे अर्जांची संख्यादेखील वाढली. सोमवारी तर अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता त्यामुळे इच्छुकांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरले. अर्ज भरण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ होती.मात्र, त्या वेळेपर्यंत आलेल्या सर्व इच्छुकांचे अर्ज दाखल करून घेण बंधनकारक असल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये हे काम सुरू होते. आज, मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांनी माघार घ्यावे यासाठी रस्सीखेच होणार आहे. शुक्रवारपर्यंत माघारीचा दिवस आहे. त्यामुळे या चार दिवसातच पात्र उमेदवारांना आपल्या जोडण्या लावून माघारीसाठी मनधरणी, ‘शब्द’ द्यावे लागणार आहेत. ---

अखेरच्या दिवशी आलेले अर्ज (कंसात एकूण अर्ज) नगरपालिका : सदस्यपदासाठी अर्ज : अध्यक्षपदासाठी अर्ज

  • जयसिंगपूर : ७८ (२०१) : ४ (१२)
  • मुरगूड : ३१ (२२३) : ३ (१५)
  • कागल : ६९ (२५७ ) : ३ (१५)
  • शिरोळ : ३२ (११०) : ४ (९)
  • गडहिंग्लज : ४९ (१४५) : १५ (२७)
  • हुपरी : ६३ (१०५) : ८ (८)
  • कुरुंदवाड : ८१ (१७३) : ७ (१५)
  • पन्हाळा : २८ (८१) : १ (६)
  • वडगाव : ३५ (७७) : ४ (९)
  • मलकापूर : २६ (८४) : २ (६)

नगरपंचायत

  • आजरा : ३६ (१३५) : ५ (१८)
  • चंदगड : ३७ (१२५) : ८ (१६)
  • हातकणंगले : ७६ (१५१) : ९ (१३)
  • एकूण : ६४१ (१८६७) : ७३(१६९)

माघारीची मुदत : शुक्रवारी (दि. २१) पर्यंतमतदान : २ डिसेंबरलामतमोजणी : ३ डिसेंबरलाएकूण लोकसंख्या : २ लाख ८० हजार ७२०

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Elections: 1867 Applications Filed, Scrutiny Today for Municipalities.

Web Summary : Kolhapur municipal elections saw 1867 applications for council seats and 169 for president. Scrutiny is today; withdrawals allowed until Friday. High competition, with an average of 7 candidates per seat. Voting is on December 2.