दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट्स आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाला. त्यातील अंतिम परीक्षेत कोल्हापूरच्या १८जणांनी यश मिळवीत बाजी मारली. त्यात ताराबाई पार्कमधील वरुण अमर दीक्षित याने देशात ३५ वा क्रमांक मिळविला आहे.
कोल्हापुरातील वरुण दीक्षित हा सीए परीक्षेच्या अंतिम परीक्षेत देशात ३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या यशाबद्दल त्याला आई नेत्रा यांनी पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. यावेळी शेजारी आजी विनिता, वडील अमर उपस्थित होते.
ठळक मुद्दे‘सीए’ परीक्षेत कोल्हापूरच्या १८ जणांची बाजी ; निकाल जाहीरवरुण दीक्षित देशात ३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण
कोल्हापूर : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट्स आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाला. त्यातील अंतिम परीक्षेत कोल्हापूरच्या १८जणांनी यश मिळवीत बाजी मारली. त्यात ताराबाई पार्कमधील वरुण अमर दीक्षित याने देशात ३५ वा क्रमांक मिळविला आहे.
चार्टर्ड अकौंटंटच्या अंतिम परीक्षेत ताराबाई पार्कमधील आदित्य कॉर्नर परिसरात राहणाऱ्या वरुण दीक्षित याने ८०० पैकी ५१४ गुणांची कमाई करीत देशात ३५ वा क्रमांक मिळविला. त्याचे वडील अमर आणि आई नेत्रा यादेखील सी. ए. आहेत. वरुण याने कॉमर्स कॉलेजमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बी. कॉम. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. पदवीचे शिक्षण घेत त्याने पुणे येथे सी. ए.साठीची इंटर्नशिप पूर्ण केली. त्याने पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेमध्ये यश मिळविले आहे.
कोल्हापूरमधील निकिता जाधव, स्वप्निल वैद्य, शुभम हारगुडे, चिन्मय कुलकर्णी, प्रीती हरचंदानी, प्रणव परुळेकर, सुहास पाटील, निखिल फाटक, विनायक रेलेकर, बाबूराव बागल, अजय मलानी, सोनिया रायगांधी, वैष्णवी संकपाळ, अक्षय लोहार, मयूरी दुल्लानी, नेहा बासंतानी, अश्विनी खुडे यांनी अंतिम परीक्षेत यश मिळविले आहे. दरम्यान, सीए फौंडेशन परीक्षेत विजय हिंदुजा, ऋषभ जेसवानी, आशिष कारीरा, भावेश पटेल, पौर्णिमा वारके, नमीरा मैंदर्गी, निशांत चावला, कृतिका चावला, वर्षा तांबे, विपुल निरंकारी, तर ‘सीए सीपीटी’ परीक्षेमध्ये प्रणव वरणे, शिवानी सूर्यवंशी, आकांक्षा पाटील उत्तीर्ण झाले.
या परीक्षेतील यशासाठी केलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याचा खूप आनंद वाटत आहे. अभ्यासातील सातत्याच्या जोरावर यशाचे शिखर गाठता आले. परीक्षेसाठीच्या शेवटच्या पाच महिन्यांत दिवसातील १0 तास अभ्यास केला. माझ्या यशात आई-वडील, आजी, शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. - वरुण दीक्षित.
‘सीए’ परीक्षेत यशस्वी झालेल्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी वाढली आहे. ती आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टामुळेच या परीक्षेतील कोल्हापूरचा टक्का वाढला आहे. - नवीन महाजन, अध्यक्ष, इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट्स आॅफ इंडिया, कोल्हापूर शाखा.
Web Title: 18 candidates from Kolhapur bagged 'CA' exam; Result