शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

शिरोळ ग्रामपंचायतीचे १७६ कर्मचारी बिनपगारी फुल्ल अधिकारी... तांत्रिक अडचणीमुळे आॅनलाईन वेतन अजून प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:30 IST

शिरोळ तालुक्यातील ५३ गावांतील १७६ आकृतिबंधातील ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट बँकेतून वेतन देण्यासाठी शासनाने जानेवारी २०१८ मध्ये आदेश लागू केला होता.

संदीप बावचे।जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ५३ गावांतील १७६ आकृतिबंधातील ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट बँकेतून वेतन देण्यासाठी शासनाने जानेवारी २०१८ मध्ये आदेश लागू केला होता. कर्मचाºयांच्या बँक खात्यात आॅनलाईन पद्धतीने वेतन जमा होण्यासाठी पंचायत समिती पातळीवर शंभर टक्के कार्यवाही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हे कर्मचारी तांत्रिक अडचणीत सापडले असून, त्यांना आॅनलाईन वेतनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

शासनाच्या ग्रामविकास खात्याच्यावतीने आकृतिबंधातील ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन बँकेतून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जानेवारी २०१८ मध्ये झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचाºयांना मिळणारे किमान वेतन वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे वेतन बँक खात्यामध्ये जमा करण्याबाबतची मागणी ग्रामपंचायत कर्मचाºयांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यानंतर ग्रामविकासमंत्री व सचिव यांनी पाठपुरावा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कर्मचाºयांचे बँकेत वेतन जमा करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे सतत पाठपुरावा ठेवला आहे. शिरोळ तालुक्यात ५२ ग्रामपंचायती असून, शिरोळ येथील सहा कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यामुळे १७६ कर्मचारी आकृतिबंधातील आहेत. पंचायत समितीकडून जवळपास १५० कर्मचाºयांची माहिती संकलित करण्यात आली आहे. अजूनही २६ कर्मचाºयांची माहिती अपुरी आहे. एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यासाठी ही प्रक्रिया होणार आहे.कर्मचाºयांची माहिती अपुरीग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त माध्यमातून राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामसेवकांमार्फत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सर्वंकष माहिती देण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्यानंतर जवळपास १५० हून अधिक कर्मचाºयांची माहिती संकलित झाली आहे. पाच ते सहा गावांमधील कर्मचाºयांची माहिती अजूनही अपुरी आहे.ग्रामसेवकांची जबाबदारीआॅनलाईन वेतनप्रणालीसाठी ग्रामपंचायत कर्मचाºयाचे नाव, जन्मतारीख, सेवानिवृत्तीचा दिनांक, कार्यालयातील उपस्थिती, आधार क्रमांक, बचत खाते क्रमांक, भविष्य निर्वाह निधीचा संयुक्त खाते क्रमांक आणि वेतन अनुदान याबाबतची माहिती ग्रामसेवकाला प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाºयाच्या आॅनलाईन वेतन प्रणालीवर भरावी लागणार आहे. 

ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने आॅनलाईन वेतन योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे. अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. येत्या १० जुलैला संघटनेचे नागपूर येथे अधिवेशन होत आहे. यामध्ये वेतनश्रेणी, पेन्शन व विविध मागण्यांबाबत चर्चा होणार आहे.- सतीश भोसले, ग्रा. पं. कर्मचारी युनियन, तालुका उपाध्यक्ष.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरonlineऑनलाइनMONEYपैसा