शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महाद्वार रोडवर १५ धोकादायक इमारती; विसर्जन मार्गाची प्रशासनाकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:59 IST

विसर्जन मार्गातील खड्डे बुजवा, अतिक्रमणे काढा

कोल्हापूर : महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी आणि पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी बुधवारी (दि. ३) सायंकाळी शहरातील पारंपरिक विसर्जन मार्ग आणि पर्यायी मार्गाची पाहणी केली. दोन्ही मार्गांवरील खड्डे बुजवून अतिक्रमण काढावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. सुरक्षेसाठी मिरवणूक मार्गातील धोकादायक इमारतींसमोर बॅरिकेडिंग केले जाणार आहे.सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक शनिवारी (दि. ६) सकाळी मिरजकर तिकटी येथून सुरू होणार आहे. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा टॉवरमार्गे मिरवणूक क्रशर खणीकडे जाणार आहे. या पारंपरिक मार्गासह सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर मार्गे क्रशर खणीकडे जाईल. पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्यासह शहरातील सर्व पोलिस निरीक्षकांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

वाचा- विसर्जन मिरवणुकीत पापाची तिकटीवरून महाद्वारवर प्रवेश नाही, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह टेहळणी मनोरेमार्गातील खड्डे बुजवण्यासह दुकानांचे अतिक्रमण हटवणे, रस्त्यात लटकलेल्या विद्युत तारा, केबल्स काढणे, अडथळे ठरणाऱ्या स्वागत कमानी काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या. अधिकाऱ्यांनी क्रशर खणीचीही पाहणी केली. शहर अभियंता रमेश मस्कर, पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, श्रीराम कन्हेरकर, सुशांत चव्हाण, नंदकुमार मोरे, संतोष डोके यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.महाद्वार रोडवर सहा धोकादायक इमारतीमहाद्वार रोडवर एकूण १५ धोकादायक इमारती होत्या. त्यापैकी नऊ इमारतींची दुरुस्ती केली आहे. उर्वरित सहा इमारतींचा धोका अजूनही आहे. या इमारतींसमोर कोणी थांबू नये यासाठी समोरच पत्रे मारून सूचना फलक लावले जाणार आहेत, अशी माहिती शहर अभियंता रमेश मस्कर यांनी दिली.मिरवणूक मार्गात २६ स्वागत मंडपपारंपरिक मिरवणूक मार्गात महापालिकेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे २६ स्वागत मंडप असतील. मिरवणुकीतील वाहनांना मंडपांचा अडथळा होऊ नये यासाठी पोलिसांकडून त्यांना जागा निश्चित करून दिली जाणार आहे. अरुंद रस्त्यावर मंडपांना परवानगी मिळणार नाही. तसेच मंडपाच्या आकारावरही मर्यादा राहतील, असे पोलिसांनी सांगितले.वाहतूक शिस्तीसाठी अधिकारी रस्त्यांवरदेखावे पाहण्यासाठी बुधवारी रात्रीपासून शहरात गर्दी वाढत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत गर्दी राहणार आहे. या काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर थांबून वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी सूचना पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे.दोन दिवसांत खड्डे बुजतील?मिरजकर तिकटीपासून पुढे संपूर्ण मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश महापालिकेच्या प्रशासक आणि पोलिस अधीक्षकांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत सर्व खड्डे बुजवून रस्ते खड्डेमुक्त होणार काय? असा सवाल मंडळांकडून उपस्थित केला जात आहे.