कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या ८१ पैकी ४१ खुल्यांसह विविध प्रवर्गातील जागा महिलांसाठी राखीव आहेत. या जागांसाठी तब्बल १४९ महिला रिंगणात असून, त्याशिवाय खुल्या, नागरिकांचा मागासप्रवर्ग व अनुसूचित जाती प्रवर्गातील आठ ठिकाणीही महिलांनी आव्हान उभे केले आहे. त्याचबरोबर नागरिकांचा मागासप्रवर्ग व अनुसूचित जाती/जमाती या राखीव प्रवर्गात पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची गर्दी पाहावयास मिळत आहे.महापालिकेची निवडणूक तिरंगी होत आहे. वीस प्रभागांतील ८१ जागांसाठी तब्बल ३२७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यामध्ये ४१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. महिलांसाठी राखीव झाल्याने अनेकांची गोची होती. पण, या निवडणुकीत महिला राखीव गटातही उमेदवारीसाठी चुरस पाहावयास मिळाली. त्यातून, ४१ राखीव गटातून १४९ उमेदवार तर सर्वसाधारण, नागरिकांचा मागासप्रवर्ग व अनुसूचित जाती गटातून ८ जागांवर महिलांनी उमेदवारी दाखल केल्याने तब्बल १५७ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तब्बल ३४ महिला अपक्षमहापालिकेसाठी १५७ महिला रिंगणात आहेत. त्यापैकी तब्बल ३४ महिला अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गातून महिलांची भाऊगर्दीअनुसूचित जाती/ जमाती या प्रवर्गासाठी ८१ पैकी ११ जागा रिक्त आहेत. त्यापैकी ६ महिलांसाठी राखीव आहे. सहा जागांसाठी तब्बल ३३ महिला रिंगणात उतरल्या आहेत.
खुल्या प्रवर्गातूनही आठ महिलासर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून आठ महिला रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ४ ‘ब’, ६ ‘अ’, ११ ‘क’, ११ ‘ड’, १३ ‘क’, १३ ‘ड’ व १५‘अ’, १८ ‘क’ येथून महिलांनी आव्हान उभे केले आहे.
असे आहेत प्रर्वगनिहाय उमेदवार...प्रवर्ग - एकूण जागा - रिंगणातील उमेदवार
- सर्वसाधारण - २५ - १२१
- सर्वसाधारण महिला - २४ - ७७
- नागरिकांचा मागासप्रवर्ग - १० - ३४
- नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला - ११ - ४२
- अनुसूचित जाती - ०५ - १९
- अनुसूचित जाती महिला - ०६ - ३४
Web Summary : In Kolhapur's municipal election, 157 women are competing for 49 reserved seats and several open category positions. Women outnumber men in OBC and SC/ST reserved categories, showcasing significant female participation in this election.
Web Summary : कोल्हापुर नगर निगम चुनाव में, 157 महिलाएं 49 आरक्षित सीटों और कई खुली श्रेणी के पदों के लिए प्रतिस्पर्धा कर रही हैं। ओबीसी और एससी/एसटी आरक्षित श्रेणियों में पुरुषों से अधिक महिलाएं हैं, जो इस चुनाव में महत्वपूर्ण महिला भागीदारी को दर्शाती हैं।