शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने १.४३ कोटींचा गंडा, नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे दिली खोटी; कोल्हापूर, सांगलीतील २७ तरुणांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 12:11 IST

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कुरुंदवाड : रेल्वे, आयकर व भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे सांगून खोटी नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे देऊन २७ जणांची १ कोटी ४३ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आनंदा गणपती करडे (रा. कुरुंदवाड) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी  ४ एप्रिल २०२१ ते २२ जुलै २०२२ या काळात रेल्वे खात्यात, आयकर विभागात व भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे सांगून क्रांतीकुमार पाटील (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), मोहम्मद कामील अब्दुल गफार ( सध्या रा. कुर्ला मुंबई, मुळगाव नुरी मशीद जवळ, जाफर नगर नागपूर), अनिसखान गुलाम रसूलखान ( काटोल रोड नागपूर), रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग (कोलकत्ता), सुबोध कुमार (कोलकत्ता) यांनी वेगवेगळ्या भागातील  २७ जणांना बोगस नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे देऊन १ कोटी ४३ लाखाची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यामध्ये कोल्हापूर, सांगली जिल्हयासह दिल्ली येथील तरुणांचा समावेश आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत. कुटुंबे आर्थिक व मानसिक तणावाखालीफसवणूक झालेल्या अनेक तरुणांच्या पालकांनी शेती, सोने गहाण ठेवून तर काहींनी कर्जे काढून नोकरीसाठी पैसे दिले आहेत. मात्र नोकरीही नाही आणि पैसेही गेल्याने अनेक कुटुंबे आर्थिक व मानसिक ताणतणाव आहेत. 

फसवणूक झालेल्या तरुणांची नावेरोहीत कोळी राजापुरवाडी ता. शिरोळ, अरुण महेश खरपे (कुरुंदवाड ता. शिरोळ), संतोष संभाजी पाटोळे (कवठेमहांकाळ, जि. सांगली), रजत बाळकृष्ण लंबे ( राजापुर ता. शिरोळ), शंतून बाळनाथ रावळ  निगवे दुमाला, कोल्हापुर), नितीन विलास शिंदे (रा. आष्टा जि. सांगली), सुयोग रमेश माने (रा. सोनारवाडी ता. भुदरगड), साईनाथ पांडुरंग धोंड ( रा. खालाचीवाडी शेनोली ), पवन सर्जेराव पाटील (रा. पाटेकर वाडी), सुरज पांडुरंग खडके (रा. मुगळी ता. गडहिंग्लज), निरंज अशोक देसाई (रा. नेंगरूळ), रमेश पांडुरंग पोवार (रा. मुगळी ता गडहिंग्लज), सुनिल लक्ष्मण तुरके (रा लिंगनूर, सांगली), अभिजीत बाबुराव तोड़कर (रा. लिंगनूर), अक्षय अशोक शिंदे (रा नागठाणे ),

सुनिल दादासाहेब पाटील (रा. म्हैशाळ), राजु भाऊसाहेब शिंदे  (रा. तावशी ता. अथणी), तेजस रावसाहेब पाटील (रा. खुजगाव, सांगली ), किरण राजाराम जाधव (रा. वडीये ता. कडेगाव), किरण राजाराम जाधव (रा. वडीये ता. कडेगाव), आकाश व अभिषेक करडे (रा. कुरूंदवाड), अरविंद चंद्रकांत गावडे (रा. राजापुरवाडी ), दिपक रामप्रसाद (रा. छत्तरपुर दिल्ली), जितेश कुमार (रा. छत्तरपुर, दिल्ली), ब्रजगोपाल (रा. छत्तरपुर दिल्ली ), शिवाजगत नारायण (रा. छत्तरपुर दिल्ली), जयेश कांबळे (रा. मंबई), सुरज बदामे (रा. टाकळीवाडी ता. शिरोळ) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस