शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Pune-Bangalore Highway: १४ ब्लॅक स्पॉट, सहापदरीकरणातही वाट बिकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:06 IST

उड्डाणपूल, भुयारी मार्ग करुनही प्रवास धोकादायक

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरीलकोल्हापूर जिल्हा आणि बेळगावपर्यंत सहापदरीकरणाच्या कामात मोठे ब्लॅक स्पॉट काढण्यासाठी डोंगर फोडले जात आहेत. उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार केले जात आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलिस, परिवहन प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गावर चौदा अपघातप्रवण ठिकाणे निश्चित केली आहेत. येथील उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू केली आहे.महाराष्ट्रातील सातारा ते सीमा भागातील बेळगावपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. या मार्गावरील बेळगाव जिल्ह्यातील स्तवनिधी घाट, सुतगट्टी डोंगर फोडून धोकादायक वळणे काढून कायमचे ब्लॅकस्पॉट काढले जात आहे. येथे आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूलही उभारले आहेत. कोगनोळी टोलनाका ते साताऱ्यापर्यंतही अपघात प्रवण परिसरात भुयारी मार्ग, उड्डाणपूल बांधले जात आहेत. तीव्र वळणे काढून रस्त्याची उंची एक समान केली जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील १४ ब्लॅक स्पॉटवर विविध उपाययोजना करण्यात येणार आहे.मुरगूड नाका येथील शाळा, कॉलेज मुले महामार्गावर उलट्या दिशेने येऊ नये म्हणून संबंधित शाळा, कॉलेजला पत्र देणे, लक्ष्मी टेकडी येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधून येणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेक बसवणे, मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूस १०० मीटर अंतरावर रम्बलर स्टिप, ब्लिंकर्स बसवणे, कणेरी फाटा येथे नवीन ब्रीजचे काम गतीने पूर्ण करणे, ॲप्रोच रस्त्यावर स्पीड ब्रेकर तयार करणे, बाजू पट्टी वाढवणे, अनावश्यक रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करणे, पिरदर्गा ते सांगली फाट्यापर्यंत वाहनांना वेग मर्यादा लावणे, सांगली ते शिरोली सेवा रस्ता जोडणे असे उपाययोजना करण्यात येणार आहे.

चौदा ब्लॅक स्पॉट परिसरात उपायमाहिती फलक लावणे, दुभाजकांमधील गवत, झाडांच्या फांद्या तोडणे, नो पार्किंग फलक लावणे, मुख्य रस्त्यावर पट्टे मारणे, रोड मार्किंग करणे, रस्ता रुंद करणे.

आठवडी बाजार हलवणेटोप ते संभापूरपर्यंत ब्लॅक स्पॉट निघण्यासाठी महामार्गलगतचे आठवडा बाजार हलवणे, संभापूर रोडचा उतार कमी करणे अशा उपाययोजना प्रस्तावित आहेत. अंबप फाटा येथे अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना घडत आहेत. नागाव फाटा येथे एका स्टील कंपनीच्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले आहे. यासंबंधी कंपनीस पोलिस प्रशासन पत्र देणार आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची नावे आणि कंसात अंतर असे :मुरगूड नाका (५०० मीटर), लक्ष्मी टेकडी, कणेरीवाडी फाटा (प्रत्येकी ६०० मीटर), गोकुळ शिरगाव ( ५०० मीटर), उचगाव रेल्वे ब्रीज (प्रत्येकी ६०० मीटर), पीरदर्गा ते सांगली फाटा ( ८०० मीटर), नागाव फाटा (६०० मीटर), कासारवाडी फाटा ( ७०० मीटर), टोप ते संभापूर (८०० मीटर), मंगरायाची वाडी, अंबप फाटा ( प्रत्येकी एक किलोमीटर), वाठार (८०० मीटर), किणी (२०० मीटर), घुणकी (एक किलोमीटर).