शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Kolhapur: रुईतील सचिन कांबळे मूत्यूप्रकरणी १४ जण अटकेत, आरोपीच्या ओळख परेडवेळी पोलिस गाडीवर दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 17:31 IST

गावात तणाव, गावाला पोलिस छावणीचे स्वरूप

हातकणंगले : रुई (ता. हातकणंगले) येथील सचिन कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी १४ आरोपींना पोलिसांनी अटक करून इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना दि. २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीच्या ओळख परेडसाठी गेलेल्या पोलिस गाडीवर आंबेडकरनगर येथे जमावाने दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.रुई येथील दोन समाजामध्ये शुक्रवारी रात्री वाद मिटविण्याच्या बैठकी मध्येच वादावादी होऊन दोन समाजांचे युवक एकमेकांसमोर भिडल्याने झालेल्या हाणामारीमध्ये सचिन कांबळे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात १६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यातील नंदकुमार बळी साठे (वय ५३) जितेंद्र चिंतू यादव (वय ३८), अशोक विश्वास आदमाने (वय ४१), अनोष जितेंद्र साठे (वय १९) , नीलेश अनिल ऊर्फ आनंदा साठे (वय २९) , दिलीप गुंडा साठे (वय ३०), प्रथमेश उर्फ राज आनंदा साठे (वय २३), सचिन विलास शिंदे, (वय ३८), सौरभ दगडू भिंगारे (वय २६), जयदीप अनिल ऊर्फ आनंदा साठे (वय २५), अनिल विठ्ठल साठे (वय ३८), प्रेम संजय साठे (वय २३), तुषार इस्वाईल साठे, (वय २३), आदर्श इस्त्राईल साठे (वय २५) या चौदा आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील दोन आरोपी अद्याप फरारी आहेत. आरोपीना ओळख परेडसाठी पोलिस गाडीतून गावामध्ये नेले असता आंबेडकरनगर येथे आरोपी असलेल्या गाडीवर जमावाने दगडफेक करून पोलिस गाडीच्या काचा फोडल्याने गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जादा कुमक मागविल्यामुळे गावाला पोलिस छावणीचे रूप आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस