शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात वीटभट्टी, ऊसतोड कामगारांची १३६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात, अवनिचा पुढाकार 

By संदीप आडनाईक | Updated: February 8, 2025 17:08 IST

मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्याचा निर्धार

संदीप आडनाईककोल्हापूर : बाल हक्क संरक्षण विषयात काम करणाऱ्या कोल्हापुरातील अवनि या संस्थेने पुढाकार घेतल्यामुळे यंदाच्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांची १३६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारानुसार ७ ते १४ वयोगटांतील बालकांना प्राथमिक शाळेत दाखल केले जाते. अवनिने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील २३ कारखाना कार्यक्षेत्रात अशी ८०० ते १००० बालके शिक्षणापासून वंचित आढळली. स्थलांतरित विकास प्रकल्प आणि वीटभट्टी साखर शाळा उपक्रमांतर्गत अवनि फक्त ११ कारखान्यांपर्यंतच पोहोचली. संस्थेने २३-२४ या हंगामात वीटभट्टीवरील वाकरे, खुपिरे, दोनवडे, जाधववाडी येथील जिल्हा परिषदेच्या तसेच महानगरपालिकेच्या शाळेत ६४ बालकांना दाखल केले.याशिवाय विद्यामंदिर कोरोची आणि कुडित्रे येथील श्रीराम हायस्कूलमध्ये ७२ ऊसतोड कामगारांच्या बालकांना प्रत्यक्ष दाखल करून त्यांना बालमजुरीतून मुक्त केले. त्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच स्कूल बॅगचेही वाटप केले. यासाठी साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवींद्र कुऱ्हाडे, वैशाली कांबळे, अंजली कांबळे, जयश्री कांबळे, शिल्पा भास्कर अश्विनी खोत आणि करूणा आठवले परिश्रम घेत आहेत.ने-आण करण्याचीही स्वीकारली जबाबदारीस्थलांतरित ठिकाणापासून शाळेचे अंतर दूर असल्याने संस्थेच्या प्रतिनिधी त्यांना रोज शाळेपर्यंत पोहोचवतात आणि शाळा सुटल्यानंतर त्यांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणतात.

  • ६४ बालके वीटभट्टीवरील कामगारांची
  • ७२ बालके ऊसतोड कामगारांची
  • ४ ते ६ वयोगटांतील बालकांनाही शिक्षण
  • ११ ठिकाणी डे केअर सेंटर सुरू
  • १७८ बालके गिरवताहेत शिक्षणाचे धडे

खरंतर ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी अंगणवाडीची जबाबदारी शासनाची आहे. मागणी करूनही याकडे दुर्लक्ष झाले, म्हणून अवनिने काही डे-केअर सेंटर सुरू केले. यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या मुख्याध्यापकांचे तसेच शिक्षकांचेही सहकार्य लाभत आहे. -अनुराधा भोसले, अध्यक्षा, अवनि संस्था.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसSchoolशाळाStudentविद्यार्थी