कृषी महाविद्यालयात १३० बेडचे कोविड सेंटर उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:18 IST2021-06-02T04:18:28+5:302021-06-02T04:18:28+5:30
कोल्हापूर : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्यावतीने कोरोना सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहेत. सध्या कृषी महाविद्यालय ...

कृषी महाविद्यालयात १३० बेडचे कोविड सेंटर उभारणार
कोल्हापूर : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्यावतीने कोरोना सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहेत. सध्या कृषी महाविद्यालय येथे १३० बेडचे कोरोना केअर सेंटर उभे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी दिली.
कृषी महाविद्यालयातील कोविड सेंटरच्या कामाची प्रशासक बलकवडे यांनी मंगळवारी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-शहर अभियंता बाबुराव दबडे उपस्थित होते.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह येथील ७० बेडचे कोरोना केअर सेंटरसुद्धा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात लवकरच कृषी महाविद्यालय व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह येथे २०० बेडची सोय होईल. याठिकाणी महापालिकेच्यावतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या दोन्ही सेंटरचे ऑडिट करण्याच्या सूचना प्रशासक बलकवडे यांनी दिल्या आहेत. तसेच येथे स्टाफ नियुक्तीची कार्यवाही सुरू असून लवकरच दोन्ही कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.