शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पुढचा हंगाम सुरू तरी मागचा हिशोब देईनात; कोल्हापूर विभागातील १३ साखर कारखान्यांकडे ४४ कोटी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:59 IST

शेतकरी हवालदिल 

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील १३ साखर कारखान्यांनी मागील हंगामातील पूर्ण एफआरपीप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. या कारखान्यांकडे तब्बल ४४ कोटी २८ लाख २३ हजार रुपयांची थकबाकी आहे. तेरा पैकी तब्बल नऊ कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. दुसरा हंगाम सुरू झाला तरी साखर कारखाने मागील हिशोब देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गेल्या वर्षी उसाचे उत्पादन कमी झाल्याने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर आटोपला. विभागातील ४० साखर कारखान्यांनी २ कोटी २ लाख ८७ हजार ८१२ टनांचे गाळप केले. सरासरी साखर उतारा ११.९२ टक्के राखत आतापर्यंत ६४५७ कोटी ९४ लाखांची एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत.मात्र, अद्याप तेरा कारखान्यांकडून ४४ कोटी २८ लाख रुपये देय रक्कम आहे. वास्तविक उसाचे गाळप केल्यानंतर चौदा दिवसांच्या आत एफआरपीप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र, दुसरा हंगाम सुरू झाला तरी मागील पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.

म्हणून शेतकरी संघटनेच्या रेट्याची गरजमागील तीन-चार वर्षांपासून ऊसदराच्या आंदोलनाला काहीशी मरगळ आली आहे. संघटनांच्या राहुट्याही जास्त झाल्या आहेत. उसाला दर मिळतो म्हटल्यावर शेतकरीही काहीसे निवांत दिसत आहे. त्यामुळेच कारखानदार सवडीने उसाची बिले काढू लागले आहेत. यासाठी शेतकरी संघटनांच्या रेट्याची गरज आहे. शेतकऱ्यांनो, मरगळ झटका आणि रस्त्यावर उतरा, तरच तुमच्या घामाला दाम मिळेल, असे आवाहन जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने यांनी केले.प्रलंबित एफआरपीवर खरच व्याज मिळतेकेंद्र सरकारच्या कायद्यानुसार चौदा दिवसांत गाळप केलेल्या संपूर्ण उसाचे एफआरपीप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहेत. या कालावधीत पैसे दिले नाही तर १५ टक्के व्याजही शेतकऱ्यांना देणे कायद्याने बंधनकारक आहे. पण, आतापर्यंत विभागातील ‘माणगंगा’ कारखाना वगळता इतरांकडून व्याज मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार थकीत एफआरपी....कारखाना - थकीत एफआरपी 

  • आजरा - १ कोटी ९५ लाख ६६ हजार 
  • राजाराम - ६८ लाख २६ हजार 
  • कुंभी - ४ कोटी ९७ लाख ३२ हजार 
  • डी. वाय. पाटील - ३ कोटी ७ लाख ७ हजार 
  • दालमिया - ७ कोटी २५ लाख ४८ हजार 
  • इको केन - ५ कोटी ४० लाख ५९ हजार
  • ओलम, चंदगड - ५ कोटी ७८ लाख २५ हजार 
  • नलवडे, गडहिंग्लज - ३ कोटी ७० लाख ४१ हजार 
  • हुतात्मा - २ कोटी ४७ लाख ६९ हजार 
  • राजारामबापू, साखराळे - ४ कोटी ४० लाख ५७ हजार 
  • राजारामबापू, वाटेगाव - १ कोटी ९७ लाख ५९ हजार 
  • राजारामबापू, कारंदवाडी - २ कोटी २३ लाख ७८ हजार 
  • दालमिया, शिराळा - ३५ लाख ७७ हजार 
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Sugar Factories Owe Farmers Millions Despite New Season.

Web Summary : Kolhapur and Sangli sugar factories owe farmers ₹44.28 crore from last season. Despite rules mandating payments within 14 days, 13 factories haven't paid, leaving farmers struggling. Farmer organizations are urged to push for dues and interest payments.