‘स्वाभिमानी’चे १३ उमेदवार जाहीर

By Admin | Updated: September 28, 2014 00:51 IST2014-09-28T00:46:49+5:302014-09-28T00:51:44+5:30

कोल्हापुरातील पाच जागा ‘स्वाभिमानी’ लढविणार

13 candidates for 'Swabhimani' declared | ‘स्वाभिमानी’चे १३ उमेदवार जाहीर

‘स्वाभिमानी’चे १३ उमेदवार जाहीर

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी पक्षाने आपले तेरा उमेदवार आज, शनिवारी जाहीर केले. कोल्हापुरातील पाच जागा ‘स्वाभिमानी’ लढविणार असून सातारा, सोलापूर, परभणी, अहमदनगर या जिल्ह्यांतील दहा जागांवर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिरोळमधून जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अनिल मादनाईक, हातकणंगलेतून प्रमोद कदम, शाहूवाडीतून अमर पाटील, राधानगरीमधून प्रा. डॉ. जालंदर पाटील, चंदगडमधून राजेंद्र गड्यान्नावर यांना पक्षाने रिंगणात उतरले आहे.
कोरेगावमधून संजय भगत, माढ्यातून संजय पाटील, तर पंढरपूरमधून प्रशांत परिचारक यांना रिंगणात उतरविले आहे. करमाळ्यातून संजय शिंदे, माळशिरसमधून उत्तम जानकर, पाचरीमधून विजय सीताफळे-पाटील, तर श्रीरामपूरमधून प्रभाकर कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे. इस्लामपूर व फलटण येथील उमेदवारीबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.
शिरोळ- अनिल मादनाईक, हातकणंगले- प्रमोद कदम, शाहूवाडी- अमर पाटील, राधानगरी- प्रा. डॉ. जालंदर पाटील, चंदगड- राजेंद्र गड्यान्नावर, कऱ्हाड उत्तर- मनोज घोरपडे, कोरेगाव - संजय भगत, माढा - संजय पाटील, पंढरपूर - प्रशांत परिचारक, करमाळा - संजय शिंदे, माळशिरस - उत्तम जानकर, पाचरी - विजय पाटील, श्रीरामपूर - प्रभाकर कांबळे, इस्लामपूर - निर्णय नाही.

Web Title: 13 candidates for 'Swabhimani' declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.