कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी दि. २६ ला मतदान, मतदानादिवशी स्थानिक सुटी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 11:05 IST2017-12-15T10:56:26+5:302017-12-15T11:05:00+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती २६ डिसेंबरला मतदान होत असून या दिवशी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्थानिक मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानादिवशी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी दि. २६ ला मतदान, मतदानादिवशी स्थानिक सुटी जाहीर
कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती २६ डिसेंबरला मतदान होत असून या दिवशी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्थानिक मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानादिवशी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी दिली.
करवीर तालुक्यातील वाशी, केकतवाडी, शिरोली दुमाला, निटवडे, चिंचवाड व सांगवडेवाडी, पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव, काटेभोगांव, वाळवेकरवाडी, गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी, राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी व चंदगड तालुक्यातील कडलगे खुर्द या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत.
या ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, शासकीय / निमशासकीय कार्यालये, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना, कामगारांना भरपगारी स्थानिक सुटी जाहीर करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी कळविले आहे.