शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
2
अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई
3
भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"
4
Madhav Gadgil: कोकणातील पर्यावरणीय संघर्षाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हरपला!
5
१० मिनिटांच्या डिलिव्हरीवर गिग वर्कर्सचा आक्षेप; क्विक कॉमर्स कंपन्यांचे धाबे दणाणले, काय आहे मागणी?
6
रोहित शर्माची पत्नीने रितिका सजदेहने मुंबईतील पॉश एरियात घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?
7
फक्त फोन जवळ नेला अन् पैसे उडाले! 'टॅप-टू-पे' वापरताय तर ही बातमी वाचाच; नाहीतर होईल मोठं नुकसान
8
Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका!
9
Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले, एका झटक्यात चांदी ₹१२,२२५ नं स्वस्त; Gold च्या किंमतीत किती घसरण, पाहा
11
वडिलांना वाचवण्यासाठी लेकीने बिबट्याशी दोन हात केले, उसाच्या तुकड्याने फोडून पळवून लावले
12
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील पेपर केला सोपा; २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध
13
'ठरलं होतं, आज याला मारायचंच'; मध्यरात्री प्रियकराला घरात घेतलं अन् झोपेतच पतीचा काटा काढला!
14
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवसांचा 'ब्लॉक'; कुठे, किती तास वाहतूक राहणार बंद? 
15
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण-कोण? आता कोणाच्या खांद्यावर असेल ३५,००० कोटींच्या वेदांता समूहाची जबाबदारी
16
Ritual: एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने ती व्यक्ती खरोखरंच मरते का? जाणून घ्या गंभीर परिणाम 
17
निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?
18
Video: "हे चुकीचं आहे रे..."; रोहित शर्मा चिडला, लहान मुलीच्या आईवडिलांना चांगलंच सुनावलं!
19
फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 
20
BJP MIM Alliance: सत्तेसाठी भाजपाने फक्त एआयएमआयएम नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही सेना, प्रहारची बांधली होती मोट
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार जणांनी दिली एमपीएससीच्या पूर्व परीक्षा, कोल्हापूर जिल्ह्यात किती परीक्षार्थी अनुपस्थित राहिले...वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:04 IST

प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत एका सत्रात पार पडली. जिल्ह्यातील महाविद्यालये व हायस्कूलमधील ५३ उपकेंद्रांवर ही लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा १२ हजार ६६६ जणांनी दिली.या परीक्षेसाठी १६ हजार ३१३ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती, तर ३ हजार ६४७ परीक्षार्थी अनुपस्थित होते. परीक्षा कामकाजासाठी जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर जिल्हा केंद्र प्रमुख, निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक, राज्यकर उपायुक्त, जीएसटी भवन कोल्हापूर (विशेष निरीक्षक) यांच्यासह अभिरक्षक, अतिरिक्त अभिरक्षक, सहायक अभिरक्षक व परीक्षा नियंत्रक सहायक यांची नियुक्ती करण्यात आली होती.परीक्षा व्यवस्थापनासाठी १४ समन्वय अधिकारी, ७८९ समवेक्षक, १४ समन्वय सहाय्यक कर्मचारी, १०६ लिपिक, ३ भरारी पथक अधिकारी, ५३ केटरटेकर, ३ भरारी पथक सहायक कर्मचारी, ४३० शिपाई कर्मचारी, ५३ उपकेंद्रप्रमुख, १२ जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, २३८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक परीक्षार्थीची बायोमेट्रिक पडताळणी व स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.शहरातील सर्व ५३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली असून, कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक कोल्हापूर गजानन गुरव यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : MPSC Exam Held in Kolhapur: Thousands Appeared, Many Absent

Web Summary : Over 12,000 appeared for the MPSC exam in Kolhapur. 3,647 candidates were absent. Strict security, including biometric verification and CCTV, ensured smooth, peaceful conduct across 53 centers. No irregularities reported.