शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जिल्हयातील ११८० प्रवाशांनी काल केला एसटी प्रवास, ५६ हजारावर उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 17:53 IST

लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या एसटी बसेसच्या माध्यमातून काल दिवसभरात जिल्हयातील ११ आगारातील ३५ बसच्या ८० फेऱ्यातून १ हजार १८० प्रवाशांनी प्रवास केला असून ५६ हजार ११६ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी आज दिली.

ठळक मुद्देजिल्हयातील ११८० प्रवाशांनी काल केला एसटी प्रवास३५ बसच्या ८० फेऱ्यातून ५६ हजारावर उत्पन्न : विभाग नियंत्रक रोहन पलंगे

कोल्हापूर :लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या एसटी बसेसच्या माध्यमातून काल दिवसभरात जिल्हयातील ११ आगारातील ३५ बसच्या ८० फेऱ्यातून १ हजार १८० प्रवाशांनी प्रवास केला असून ५६ हजार ११६ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी आज दिली.कोल्हापूर आगाराच्या कोल्हापूर-जयसिंगपूर मार्गावर २ बसेसच्या ४ फेऱ्यातून ८७ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये २ हजार ५७० रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-इचलकरंजी मार्गावर एका बसच्या ८ फेऱ्यातून १०७ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ५ हजार ३० रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-गडहिंग्लज मार्गावर एका बसच्या २ फेऱ्यातून २४ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ६ हजार २९१ रूपयांचे उत्पन्न मिळाले.संभाजीनगर आगाराच्या रंकाळा-हुपरी मार्गावर ३ बसेसच्या १२ फेऱ्यातून १८३ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ३ हजार ६९५  रूपयांचे उत्पन्न मिळाले. इचलकरंजी आगाराच्या इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर ४ बसेसच्या १८ फेऱ्यातून ३०२ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये १० हजार ५२० रूपयांचे उत्पन्न मिळाले. 

गडहिंग्लज आगाराच्या गडहिंग्लज-कोल्हापूर मार्गावर ४ बसेसच्या ८ फेऱ्यातून १४२ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये १५ हजार ७७५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. गारगोटी आगाराच्या गारगोटी-कोल्हापूर मार्गावर २ बसेसच्या ४ फेऱ्यातून ६५ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ४ हजार ११० रूपयांचे उत्पन्न मिळाले. 

गारगोटी-मुरगूड-कोल्हापूर मार्गावर एका बसेसच्या एका फेरीतून १३ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ४९५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-मुरगूड मार्गावर एका फेरीतून फेऱ्यातून १३ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ६५० रूपयांचे उत्पन्न मिळाले. चंदगड आगाराच्या चंदगड-गडहिंग्लज मार्गावर एका बसच्या ४  फेऱ्यातून २८ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये २९५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.कुरूंदवाड आगाराच्या कुरूंदवाड-जयसिंगपूर मार्गावर एका बसच्या ४ फेऱ्यातून २१ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये २६० रूपयांचे उत्पन्न मिळाले. कुरूंदवाड-कोल्हापूर मार्गावर एका बसच्या ४ फेऱ्यातून ७७ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ३ हजार ४२५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. 

कागल आगाराच्या कागल-रंकाळा मार्गावर २ बसेसच्या ४ फेऱ्यातून ३८ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ८८५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. राधानगरी आगाराच्या कोल्हापूर-राधानगरी मार्गावर एका बसच्या २ फेऱ्यातून ३६ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये १ हजार ६२५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. आजरा आगाराच्या आजरा सोहाळे सुतगिरण मार्गावर एका बसच्या ४ फेऱ्यातून ५१ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ४९० रूपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचेही पलंगे म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीkolhapurकोल्हापूर