मास्क न वापरणाऱ्या १११ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 19:53 IST2021-04-30T19:50:54+5:302021-04-30T19:53:49+5:30
CoronaVirus Kolhapur : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या १११ नागरिकांना महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस पथकाने दंडाची कारवाई करून त्यांच्याकडून ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

मास्क न वापरणाऱ्या १११ नागरिकांना दंड
ठळक मुद्देमास्क न वापरणाऱ्या १११ नागरिकांना दंड ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या १११ नागरिकांना महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस पथकाने दंडाची कारवाई करून त्यांच्याकडून ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने या गोष्टी सक्तीच्या केल्या आहेत त्याचे पालन पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात काही नागरिक विनामास्क फिरत असल्याचे लक्षात येताच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.