मानेवाडी-भाचरवाडी रस्त्याला ११ लाखांची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST2020-12-05T05:01:26+5:302020-12-05T05:01:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : विक्रम पाटील पन्हाळा तालुक्यातील पश्चिम परिसरातील कोतोली बाजारपेठेला जोडणारा व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोईचा ...

11 lakh sanction for Manewadi-Bhacharwadi road | मानेवाडी-भाचरवाडी रस्त्याला ११ लाखांची मंजुरी

मानेवाडी-भाचरवाडी रस्त्याला ११ लाखांची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजफेण : विक्रम पाटील

पन्हाळा तालुक्यातील पश्चिम परिसरातील कोतोली बाजारपेठेला जोडणारा व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोईचा ठरणारा मानेवाडी ते खेडखोळवाडी हा प्रमुख वाहतुकीचा रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाल्याने वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत होता. याविषयी ‘लोकमत’मधून बातमीतून वेळोवेळी आवाज उठविला होता. बातमीची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर पाटील यांनी जिल्हा परिषद निधीतून मानेवाडी ते भाचरवाडीपर्यंतच्या पूर्ण खराब झालेल्या रस्तादुरुस्तीसाठी ११ लाखांची मंजुरी मिळविली आहे. या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. जोरदार पावसामुळे खचलेल्या रस्त्याचा भाग व उर्वरित खडेखोळवाडीपर्यंत खराब झालेल्या रस्तादुरुस्तीसाठी आमदार विनय कोरे यांनी निधी मंजूर केला असून या कामालाही सुरुवात होणार असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे वाहनधारकांचा प्रवास सुखकर होणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोईचा असल्यामुळे या मार्गावर मोठी वर्दळ असते.

Web Title: 11 lakh sanction for Manewadi-Bhacharwadi road