शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

इराणी खणीत १०८३ गणेशमूर्तीचे विसर्जन; लहान ते २१ फूट गणेशमूर्तींचा समावेश

By सचिन भोसले | Updated: September 10, 2022 17:58 IST

इराणी खणीत शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून  विर्सजनास हनुमान विकास मंडळाच्या गणेश विसर्जनाने झाली.

कोल्हापूर : उपनगरासह शहरातील २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावपरिसरातील इराणी खण व त्या शेजारील दुसऱ्या खणीत शुक्रवारी (दि.०९) पासून शनिवारी दुपारपर्यंत १०८३ हून अधिक लहान मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. हे विसर्जन पाहण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती.

इराणी खणीत शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून  विर्सजनास हनुमान विकास मंडळाच्या गणेश विसर्जनाने झाली. त्यानंतर शिवसृष्टी मंडळ, वटवृक्ष काॅलनी, ब्लड ग्रुप, नापस्टार तरूण मंडळ, अमर तरूण मंडळ, कात्यायानी काॅम्प्लेक्स, जय शिवराय तरूण मंडळ, स्वयंभू गणेश मंडळ, जोतीबा रोड फुलवाले मित्र मंडळ, शिवालय तरूण मंडळ, विवेकानंद मित्र मंडळ, डी बाॅईज मित्र मंडळ, मनिषानगर मित्र मंडळ, फ्रेंडस मित्र मंडळ, शिवराज मंडळ, पटेल मित्र मंडळ , फायटर ग्रुप यांचा पहिल्या टप्प्यात विसर्जन झाले. त्यानंतर पर्यायी मार्गाने गणेश विसर्जनास सुरुवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत २१ गणेशांचे विसर्जन झाले. त्यानंतर पर्यायी मार्गावरून येणाऱ्या गणेशांचा मोठा ओघ सुरु झाला. तत्पुर्वी सतेज पाटील फौंडेशन व माजी नगरसेवक शारंगधर देशमुख  यांच्यामार्फत मानाचे श्रीफळ देण्यात आले.पंधरा ते २१ फुटी गणेशमूर्तीचेही विसर्जन 

पुलगल्ली तालीम मंडळ, स्वयंभू गणेश मंदीर, डाव ग्रुप, सोल्जर ग्रुप, सिद्धीविनायक लोहार समाज, बजाप माजगांवकर तालीम मंडळ, सम्राट चौक तरूण मंडळ, वाय.पी.पोवारनगर मित्र मंडळ,संयुक्त शिवाजी चौकचा राजा आदी मंडळांचा समावेश आहे.

या प्रमुख मंडळाचेही गणेश विसर्जनमहालक्ष्मी भक्त मंडळ, सेनापती बापट तरूण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, शाहू विजयी गंगावेश, नाथागोळे तालीम मंडळ, अवचितपीर तालीम मंडळ, सरदार तालीम मंडळ, गुजरी मित्र मंडळ, मदनलाल धिंग्रा तरूण मंडळ, न्यू संभाजीनगर फुटबाॅल क्लब, प्रतापसिंह तरूण मंडळ, जयशिवराय तरूण मंडळ, साठमारी तरूण मंडळ, शहाजी तरूण मंडळ, सुबराव गवळी तालीम मंडळ, लेटेस्ट तरूण मंडळ आदी मंडळांचा समावेश होता.

पर्यायी मार्गाचा अवलंबशहरातील काही ठराविक मंडळे सोडली तर बहुतांशी मंडळांनी हॉकी स्टेडियम, संभाजीनगर ते देवकर पाणंद यापर्यायी मार्गाचा अवलंब करीत ढोलताशे, डीजे साऊंडच्या गजरात आपले गणपती विसर्जित केले.

बत्तीस टन निर्माल्य जमागेली दोन दिवसात इराणी खान परिसरात सार्वजनिक मंडळांचे ३२ टन निर्मल्य जमा झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेशोत्सव