शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

जिल्हा बँकेकडून पाच कारखान्यांना १०३ कोटींचे कर्ज : हसन मुश्रीफ

By admin | Published: September 22, 2015 1:07 AM

त्यांच्याकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेतल्यानंतर पाच कारखान्यांना १०३ कोटी ६० लाख ५८ हजार रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

कोल्हापूर : जिल्हा बँकेशी संलग्न असणाऱ्या पाच साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे उसाची बिले देण्यासाठी १०३ कोटी ६० लाखांच्या कर्जास मंजुरी दिल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कर्ज मंजुरीमुळे ३० सप्टेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेशी संलग्न भोगावती (परिते), आजरा, छत्रपती राजाराम (कसबा बावडा), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री), हिरण्यकेशी या कारखान्यांचे सॉफ्ट लोन व गॅप लोनचे प्रस्ताव बॅँकेकडे होते. त्यांच्याकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेतल्यानंतर पाच कारखान्यांना १०३ कोटी ६० लाख ५८ हजार रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला पंजाब नॅशनल बँकेकडून १७ कोटी तर आप्पासाहेब नलवडे कारखान्याला युनियन बँकेकडून आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. उर्वरित कारखाने हे राज्य बँकेसह विविध राष्ट्रीयीकृत बँकांशी संलग्न असल्याने त्यांनाही कर्ज उपलब्ध झाले आहे.  दरम्यान, ‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी बँकेने प्रयत्न सुरू केले आहेत; पण कारखान्यांवर खरेदी कर थकबाकी १५ कोटी त्याचबरोबर एनसीडीसी व एसडीएफ या केंद्रीय वित्तीय संस्थांचे थकबाकी आहे. या थकीत कर्जाचे हप्ते पाडून देण्याबाबत बॅँकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी काही कंपन्यांची आहे. यासाठी आम्ही सहकारमंत्री चंद्रकांतदादा यांच्याकडे मागणी केली आहे. कारखान्याचा हंगाम महिना-दीड महिन्यांवर आल्याने अर्थमंत्री, प्रधान सचिव आदी प्रमुखांची बैठक बोलावण्याची विनंती आम्ही केल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक ए. वाय. पाटील, भैया माने, संतोष पाटील उपस्थित होते. असे मिळणार कारखानानिहाय कर्ज-कारखाना सॉफ्ट लोन अतिरिक्त खेळते भांडवल एकूण कर्जेभोगावती १८, ६१, ६२००० १९, ३,७००० ३७,६४,६९००० आजरा ६,९७,८८००० १०,२८,५५००० १७,२६,४३००० राजाराम १२,४,१०००० २,३५ लाख १४,३९,१००००बिद्री २०,६८,१२००० - २०,६८,१२००० हिरण्यकेशी १३,६२,२४००० - १३,६२,२४०००