मोरेवाडीत १०१ दात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST2021-07-12T04:16:38+5:302021-07-12T04:16:38+5:30

लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून माजी जिल्हा परिषद सदस्या मनिषा वास्कर यांनी दीपप्रज्वलनाने शिबिराचे उदघाटन ...

101 donors donated blood in Morewadi | मोरेवाडीत १०१ दात्यांनी केले रक्तदान

मोरेवाडीत १०१ दात्यांनी केले रक्तदान

लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून माजी जिल्हा परिषद सदस्या मनिषा वास्कर यांनी दीपप्रज्वलनाने शिबिराचे उदघाटन केले. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी शिबिरास भेट देऊन लोकमतच्या मोहिमेचे कौतुक केले.

रक्तदान शिबिरासाठी माजी जि प सदस्या मनीषा वास्कर,सरपंच शशिकला भोसले,ग्रामपंचायत सदस्य संभाजी मोरे, सुनील शिंदे, माजी सरपंच अमर मोरे, प्रकाश मोरे, दत्तात्रय भिलुगडे, रामदास मोरे, सुदर्शन पाटील, बाबूराव भोसले,विश्वास साबळे,शिवाली देसाई,शीला परीट,सुनीता जाधव आदींसह कर्मचारी, तरुण मंडळे यांनी विशेष सहकार्य केले.

लोकमतचे ऑपरेशन विभाग प्रमुख राजाराम वेताळ यांनी प्रास्ताविक केले. मोरेवाडी ग्रामपंचायतचे लिपिक महेश भालकर यांनी स्वागत केले तर अनिल मोरे यांनी आभार मानले.

या रक्तदान शिबिरासाठी अर्पण ब्लड बँकेकडून डॉ. श्रीकांत नलवडे, माधव ढवळीकर, रवी पाटील, अश्विनी पाटील, अनुप्रिया जाधव, तेजस्विनी परीट यांनी सहभाग घेतला होता.

चौकट 1

लोकमतने मोरेवाडी येथे राबवलेल्या या रक्तदान शिबिराचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून व कर्मचाऱ्यांकडून उत्तम नियोजन करण्यात आले होते. रक्तदान करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या बेडवर प्रत्येक वेळी सॅनिटायझर फवारणी करून निर्जंतुक केले जात होते. तसेच कोविडच्या नियमांचे पालन करून रक्तदान करण्यात येत होते.

Web Title: 101 donors donated blood in Morewadi