शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील  १९ साखर कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 16:13 IST

राजाराम लोंढे  कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत ३४ कारखान्यांनी ...

राजाराम लोंढे कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत ३४ कारखान्यांनी १ कोटी ७३ लाख ११ हजार ९९० टनाचे गाळप केले आहे. त्यापैकी १९ कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे संपूर्ण रक्कम दिली असून आठ कारखान्यांनी ८० टक्क्यापेक्षा अधिक रक्कम खात्यावर वर्ग केली आहे. गाळपात ‘कल्लाप्पाण्णा आवाडे ‘हुपरी तर उताऱ्यात ‘दालमिया’ व अथणी शुगर्स, तांबाळेने आघाडी घेतली आहे.यंदा साखर कारखान्यांच्या हंगामाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच गती घेतली. विनाखंड हंगाम सुरू राहिल्याने गाळप वेगाने झाले. निम्या कारखान्यांचा हंगाम मार्चच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. उर्वरित कारखाने अजून किमान महिना सव्वा महिने चालतील, असा अंदाज असल्याने यंदा सव्वादोन कोटी टनापर्यंत विभागाचे गाळप जाण्याची शक्यता आहे.साखरेचे दर स्थिर राहिल्याने यंदा बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांना पंधरवड्याप्रमाणे उसाचे पैसे दिले आहेत. आतापर्यंत १९ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. ८० टक्क्यापेक्षा अधिक एफआरपी अदा करणारे ८ कारखाने आहेत. सर्वाधिक १२.९९ टक्के उतारा ‘दालमिया-आसुर्ले’, अथणी-तांभाळे कारखान्याचा आहे.यंदा ‘वारणा’चा बोलबोला!मागील दोन-तीन हंगाम वारणा साखर कारखान्याच्या दृष्टीने अडचणीचे गेले होते. मात्र त्यातून बाहेर पडत यंदा आतापर्यंत तब्बल ९ लाख २४ हजार ६०० टनाचे गाळप केलेच; त्याचबरोबर शेतकऱ्यांची १०० टक्के ‘एफआरपी’ दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रात ‘वारणा’ कारखान्यांचा बोलबोला आहे.

यांनी दिली १०० टक्के एफआरपी :जिल्हा  - कारखानेकोल्हापूर -  ‘शाहू’, ‘दत्त-शिरोळ’, ‘आवाडे-हुपरी’, ‘शरद’, ‘वारणा’, ‘अथर्व-बांबवडे’, दालमिया, इकाे केन, अथणी-तांबाले, अथर्व-दौलत.सांगली  -  राजारामबापू युनि-१, युनिट वाटेगाव, करंदवाडी, तिपेहल्ली-जत, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया-कोकरूड, उदगिरी-खानापूर.सर्वाधिक गाळप :आवाडे : १३ लाख ९२ हजार ३३३ टनवारणा : ९ लाख २४ हजार ६०० टनदत्त, शिरोळ : ८ लाख १० हजार ८८९ टन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने