शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शिंदेसेनेला पाठिंबा दिला; मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितली 'पडद्यामागची गोष्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:43 IST

स्थानिक राजकारण जे सुरू होते त्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या नेत्यांनी घेतला आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

डोंबिवली - कल्याण डोंबिवलीत एकीकडे भाजपा ५०, शिंदेसेना ५३ जागा विजयी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत आकडेमोड, पळवापळवी हा खेळ सुरू होता. ही परिस्थिती थांबताना दिसत नव्हती. भविष्यात समित्यांच्या निवडणुका असतात त्यावेळीही गोंधळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे कुठेतरी स्थिरता यावी या हेतूने आम्ही शिंदेसेनेला पाठिंबा दिला आहे. शिंदेसेना-भाजपा एकत्र लढलेत. जनतेच्या हितासाठी आम्ही त्यांना समर्थन देत आहोत अशी भूमिका मनसे नेते राजू पाटील यांनी मांडली. 

कोकण भवनात नगरसेवकांची गट नोंदणी केल्यानंतर राजू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आम्हाला काय भेटण्याऐवजी सत्तेत असल्याने विकासाची कामे होतील यासाठी आम्ही पाठिंबा दिला. आम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत युतीत लढलो होतो. निकालानंतर काही नगरसेवक गायब झाले. त्यामुळे आम्हाला आमच्या नगरसेवकांचीही चिंता होती आणि त्यांच्याही नगरसेवकांची चिंता होती. कल्याण डोंबिवलीतील जनता पळवापळवीच्या राजकारणाला कंटाळली होती हे कुठेतरी थांबावे म्हणून आम्ही पाठिंबा दिला. कुठल्याही स्वार्थासाठी घेतलेला हा निर्णय नाही. आम्ही ठामपणे सामोरे आलो आहोत. जेव्हा आमचे निकाल समोर आले आणि आम्ही इथलं गणित राज ठाकरेंना सांगितले तेव्हा स्थानिक पातळीवर जो तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तो घ्या असं साहेबांनी सांगितले. त्यानुसार आम्ही निर्णय घेतला आहे असं पाटील यांनी सांगितले.

त्याशिवाय भाजपा-शिंदेसेना एकत्र आहेत मग भाजपाला बाजूला ठेवायचा प्रश्न नाही. मला कल्याण डोंबिवतील जनतेलाही प्रश्न विचारायचा आहे. ५ नगरसेवकांमध्ये आम्ही सत्तेच्या बाहेर राहून जनतेला न्याय देऊ शकलो असतो का? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही अंकुश ठेवू शकतो. भलेही आम्ही त्यांची सत्ता पाडू शकत नाही मात्र आमचे जे मुद्दे आहेत, किमान समान कार्यक्रम घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी टीका टीप्पणी अनेकांनी केली आहे. काही ठिकाणी मनसे-उद्धवसेनेचे उमेदवार आमनेसामने लढले. परंतु आता ही वेळ नाही. स्थानिक पातळीवर हे विषय होतात. दोन्ही पक्ष नेतृत्वाचा त्यात दोष नव्हता. आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन पुढे चाललोय. कल्याण डोंबिवलीत एक स्थिरता आणायची होती त्यामुळे आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे असं राजू पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत असं राज ठाकरेंनी सांगितले होते. स्थानिक राजकारण जे सुरू होते त्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या नेत्यांनी घेतला आहे. आम्ही कल्याण डोंबिवलीत सगळ्यांसोबत लढलो. ८ ठिकाणी उद्धवसेनेचेही उमेदवार आमच्याविरोधात होते. एकदा निवडणूक संपल्यानंतर आमचे निवडून आलेले नगरसेवक त्यांना जे वाटते त्यानुसार निर्णय घेण्याची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली होती. त्यानुसार स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य देत राजू पाटील यांनी निर्णय घेतला आहे अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : MNS supports Shinde Sena: Raju Patil reveals the 'behind-the-scenes' story.

Web Summary : MNS supported Shinde Sena in Kalyan-Dombivli for stability and development, not for personal gain. The decision, approved by Raj Thackeray, prioritizes public welfare over political rivalries. MNS aims to ensure transparency and address key issues.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaju Patilराजू पाटील