तरीही युवराज किती ही पोटदुखी? खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले ट्वीट

By मुरलीधर भवार | Updated: May 11, 2023 19:45 IST2023-05-11T19:44:45+5:302023-05-11T19:45:08+5:30

आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर

Why Aditya Thackeray suffering with stomachache taunts MP Shrikant Shinde on tweet | तरीही युवराज किती ही पोटदुखी? खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले ट्वीट

तरीही युवराज किती ही पोटदुखी? खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले ट्वीट

मुरलीधर भवार, कल्याण: मुंबई महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या रस्ते कॉंक्रिटीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी ब्लॉगद्वारे  सविस्तर माहिती दिली .मुख्यमंत्र्यांकडून उत्तरे दिली जात नसल्याचीही आदित्य यांनी टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी उपहासात्मक कविता ट्वीट करत प्रतिउत्तर  दिले आहे. 

काय आहे ट्वीट

भ्रष्टाचाराचे बाळकडू प्यायले
रस्त्यावरचे डांबर गिळले
कचऱ्याचे डोंगर फस्त केले
डिजीटल शिक्षणातून दही मटकावले

मिठीच्या गाळाचे पेले रिचवले
कोविड मृतांच्या टाळूवरचे लोणीही नाही सोडले
तरीही युवराज, किती ही पोटदुखी?
भ्रष्टाचार करुनी उभा जन्म गेला 
तरी भूक नाही संपली

बेसुमार लूटमार केल्यानंतर मती रिकामी होऊन आता बहिरी झाली आहे.

Web Title: Why Aditya Thackeray suffering with stomachache taunts MP Shrikant Shinde on tweet