शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Amit Thackeray: एकदा लोकल प्रवास करणाऱ्यांना 900 रुपयांच्या पासचा भुर्दंड कशाला? अमित ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 19:15 IST

Amit Thackeray in Kalyan Dombivali pothole roads: राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये बैठका घेतल्या. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीतील मनसे पदधिका:याची बैठक मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतली.

कल्याण-नाशिकमध्ये आपल्या महापालिकेच्या सत्ताकाळात मनसे जे रस्ते विकसीत केले. ते आजही उत्तम स्थितीत आहेत. पाऊस काय फक्त कल्याण डोंबिवलीत पडतो का ? नाशिकमध्ये पाऊस पडत नाही का ? नाशिकमधील रस्ते उत्तम राहतात. तर कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावर खड्डे का पडतात ? असा सवाल मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये बैठका घेतल्या. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीतील मनसे पदधिका:याची बैठक मनसे नेते ठाकरे यांनी घेतली. या बैठकीपश्चात त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपरोक्त सवाल उपस्थित करीत मुंबई, ठाणो आणि कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे प्रश्नाचा समाचार घेतला. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अमेय खोपकर,मनसे आमदार राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मनसे नेते ठाकरे यांनी आज मनसे बैठकीला येण्यासाठी दादरहून रेल्वेने प्रवास करुन डोंबिवली गाठली. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डयामुळेच रेल्वेने प्रवासकरुन अवघ्या 4क् मिनिटात डोंबिवली गाठली. मुंबईतही प्रचंड खड्डे आहे. मुंबईतून बाहेर पडता येत नाही. ट्रेनने आलो आत्ता पुन्हा घरी ट्रेनने जाणार आहे. सामान्यांना रस्त्यावरील खड्डय़ांचा किती त्रस सहन करावा लागतो याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. २५ वर्षापासून सत्तेवर असलेल्या पक्षांनी साधे रस्ते विकासाचे नियोजन करु शकले नाहीत. रस्ते नीट नाहीत. विकास करण्यासाठी इच्छा शक्ती लागते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे ती इच्छा शक्ती आहे. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली परिसरात रस्त्यावरील खड्डय़ांची समस्या आहे. रस्त्यावरील खड्डय़ांच्या तक्रारी नागरीकांसह मनसे कार्यकत्र्यानी आमच्याकडे केलेल्या आहे. इथल्या सत्ताधा:यांनी अन्य समस्यांही सोडविलेल्या नाहीत.

९०० रुपयांच्या पास भुर्दंड एकदा प्रवास करणा:या प्रवाशाच्या माथी कशाला ?मनसे नेते ठाकरे यांनी सांगितले की, मी रेल्वेने दादरहून डोंबिवलीला आलो तेव्हा मला 900 रुपयांचा पास काढावा लागला. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या तिकीट दिले जावे. ज्या प्रवाशाला एकदाच प्रवास करायचा आहे. त्याला ९०० रुपये पास काढण्याची सक्ती का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तिकीट देण्याची सुविधा सुरु करावी. सरसकट सगळया प्रवाशांना हा ९०० रुपयांचा भुर्दंड का असे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे