राम जपाच्या गजरात संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमला 

By अनिकेत घमंडी | Updated: January 6, 2024 12:36 IST2024-01-06T12:35:35+5:302024-01-06T12:36:32+5:30

राष्ट्रीय स्वयं सेवक संघ  आणि माजी नगरसेवक खुशबू चौधरी यांनी केले  अक्षता कलशाचे स्वागत.

whole area of dombivli was filled with chanting of ram naam | राम जपाच्या गजरात संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमला 

राम जपाच्या गजरात संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमला 

अनिकेत घमंडी, डोंबिवली : शहराततील  सारस्वत कॉलनी,  आणि डोंबिवलीच्या मुख्य भागात शनिवारी आयोद्य्या येथील श्रीराम मंदिर येथून आलेल्या अक्षता कलशाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. त्यावेळी मोठी दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीत जवळपास ३५० विद्यार्थी , १० वारकरी , मोठ्या संख्येने राम भक्त सहभागी झालेले पाहिला मिळाले. यावेळी रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.  

 ही रॅली स . वा . जोशी शाळा येथून सुरू झाली . त्यानंतर  ठाकुर्ली स्टेशन , गणेश मंदिर रोड, छेडा रोड,  नेहरू मैदान येथून सुरू होऊन सारस्वत  कॉलनी येथील  विवेकानंद सोसायटी मधील गणेश मंदिरात  ही रॅली संपन्न झाली. यावेळी गणेश मंदिरात रामाचा जयघोष करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन  मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक खुशबू चौधरी यांनी केले.या रॅलीत माजी नगरसेवक विशू पेडणेकर देखील सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान संपूर्ण परिसर भगवा झालेला पाहिला मिळाला.

Web Title: whole area of dombivli was filled with chanting of ram naam