शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या घरातील कचरा जातो कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 23:23 IST

केडीएमसी परिसर : दररोज जमा होतो ७५० किलो कोविड कचरा

मुरलीधर भवारकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या घरातील कचरा घेण्यासाठी महापालिकेकडून गाडी पाठविली जाते. त्यांचा कचरा स्वतंत्ररीत्या गोळा केला जातो. तो अन्य कचऱ्यात मिसळू दिला जात नाही. शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट उंबर्डे येथील जैववैद्यकीय कचरा प्रकल्पात लावली जाते.

महापालिका हद्दीत ३०८ खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी महापालिकेची सात कोविड रुग्णालये आहेत. खासगी कोविड रुग्णालयांची संख्या ९० आहे. खासगी कोविड रुग्णालयांतून तयार होणारा कचरा महापालिका स्वतंत्ररीत्या गोळा करते. दिवसाला जवळपास ७५० किलो कोविड कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावली जाते. सुरुवातीला मास्क हे यूज ॲण्ड थ्रो स्वरूपाचे होते. त्यामुळे त्यांचा खच डंपिंगवरील कचऱ्यात मिळून येत होता.

आता अनेक लोक यूज ॲण्ड थ्रो ऐवजी कापडी मास्क वापरत आहेत. जो स्वच्छ धुऊन पुन्हा वापरता येतो. त्यामुळे मास्कचाही कचरा कमी होत आहे. त्याचबरोबर जैववैद्यकीय कचरा हा कुठेही रस्त्यावर उघड्यावर टाकणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने गुन्हे दाखल करून दंड वसुली सुरू केली आहे. त्यामुळे उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होत आहे.

कचऱ्यातून कोरोना पसरू शकतो का?

कोरोनाबाधिताने वापरलेले मास्क, वस्तू यांच्या स्वरूपातील कचरा आणि दैनंदिन गोळा होणारा कचरा एकत्रित गोळा केल्यास त्यातून कोरोना पसरू शकतो. मात्र, केवळ कचऱ्यातून कोरोना पसरू शकत नाही.nमहापालिका होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या घरी गाडी पाठविते. त्यांच्या घरातून निर्माण होणारा कचरा वेगळ्या प्रकारे गोळा करून तो प्रक्रियेसाठी उंबर्डे येथील जैववैद्यकीय कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी पाठविला जातो.nत्याचबरोबर जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी आतापर्यंत तीन रुग्णालयांच्या विरोधात पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करून किमान १० हजार रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली. त्यामुळे कचरा कुणीही उघड्यावर टाकू नये असे ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका