शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सहज कुठे तरी भेट झाली म्हणून पतंग उडविण्यात काय अर्थ आहे; विनोद तावडे यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 18:00 IST

कल्याण पूर्व भागात भाजपच्या कार्यकत्र्याचा मेळावा आज शुक्रवारी पार पडला.

कल्याण- प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. नाशिकमधील मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची पुण्यात सहज भेट झाली. त्यावरुन पतंग उडविण्यात काय अर्थ आहे असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सचिव व माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येथे केले. 

कल्याण पूर्व भागात भाजपच्या कार्यकत्र्याचा मेळावा आज शुक्रवारी पार पडला. यावेळी  भाजपा प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्नी जगन्नाथ पाटील, कल्याण मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, राजन वारे, अभिजित करंजुले, राजू कवठाऴे, जिल्हा सरचिटणीस भारत फुलोरे, अर्जुन म्हात्रे, युवा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई, महिला अध्यक्ष नगरसेविका रेखा चौधरी उपस्थित होते. 

भाजपचे राष्ट्रीय सचीव तावडे हे गेल्या दोन वर्षापासून राजकारणात दिसत नव्हते. याबाबत पत्रकारांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता तावडे यांनी सांगितले की, त्यांच्याकडे पक्षाने हरियाणाची जबाबदारी दिली होती. त्यासाठी ते हरियाणा येथे जात येत  होते. महाराष्ट्रात तावडे दहा दिवस असतात. त्या वेळेत ते पक्षाच्या कामासाठी महाराष्ट्रातील कार्यकत्र्याना वेळ देतात. निवडणूका आल्या म्हणून हा मेळावा घेतला आणि मार्गदर्शन केले असे नाही असे स्पष्ट केले. दरम्यान तावडे यांचे दुर्गाडी चौकात जोरदार स्वागत झाले. त्यानंतर त्यांनी माजी आमदार पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याचबरोबर शहरातील शिक्षण क्षेत्रतील अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतली. शिक्षण या विषयावर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाkalyanकल्याण