कल्याण : लस घेण्यासाठी निघालेल्या विवाहितेचा खड्ड्यांमुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 23:31 IST2021-07-02T23:31:19+5:302021-07-02T23:31:37+5:30

उपचारादरम्यान झाला महिलेचा मृत्यू.

Welfare: A married woman who went for coronavirus vaccination died due to potholes | कल्याण : लस घेण्यासाठी निघालेल्या विवाहितेचा खड्ड्यांमुळे मृत्यू

प्रातिनिधीक छायाचित्र

ठळक मुद्देउपचारादरम्यान झाला महिलेचा मृत्यू.

कल्याण - कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना दुचाकीला खड्ड्यांमुळे अपघात होऊन विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विवाहितेचे नाव दिव्या राहुल कटारिया असे आहे. 

कल्याण पश्चिम भागातील ऋतू कॉम्प्लेक्स या हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या दिव्या कटारिया या शिक्षिका होत्या. २३ जून रोजी त्यांच्या दीरा सोबत दुचाकीवरून घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी त्यांचे दीर चालवत होते. गांधरी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीने एका वाहनाला ओव्हरटेक केले. मात्र रस्त्यावरील पाण्याने भरलेला खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात जोराने आदळली. यावेळी दिव्या यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

घटनेच्या चार दिवसानंतर उपचार घेत असताना दिव्या यांचा मृत्यू झाला. ही माहिती दिव्याचे दीर अर्जुन कटारिया यांनी दिली आहे. खड्यांनी एका महिलेचा बळी गेल्याने कटारिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील खड्डे आता नागरिकांचा जीव घेऊ लागले आहे ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.

Web Title: Welfare: A married woman who went for coronavirus vaccination died due to potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.