कल्याण: आठवडी  बाजराला मिळाला उत्तम प्रतिसाद; महापालिका आयुक्तांनी केले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 10:53 AM2021-12-27T10:53:23+5:302021-12-27T10:54:13+5:30

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः आठवडी बाजाराची पाहणी करून आयोजकांचे कौतुक केले.

weekly market gets good response in kalyan inauguration by kdmc municipal commissioner | कल्याण: आठवडी  बाजराला मिळाला उत्तम प्रतिसाद; महापालिका आयुक्तांनी केले उद्घाटन

कल्याण: आठवडी  बाजराला मिळाला उत्तम प्रतिसाद; महापालिका आयुक्तांनी केले उद्घाटन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि., Growers Direct India ltd.आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारास उत्तम प्रतिसाद मिळाला असून  या आठवडी बाजारासाठी मुंबई विद्यापीठाच्या मागे, उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर हा बाजार भरविण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली होती. शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला आणि फळे थेट ग्राहकांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

आठवडी बाजाराचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते  झाले आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी स्वतः आठवडी बाजाराची पाहणी करून आयोजकांचे कौतुक केले, यावेळी उप अभियंता जगदीश कोरे , शमीम केदार, कनिष्ठ अभियंता दिलीप शिंदे आणि ब प्रभागाचे सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप व आयोजक नरेंद्र पवार उपस्थित होते. या आठवडी बाजाराला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता यापुढे दर रविवारी या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Web Title: weekly market gets good response in kalyan inauguration by kdmc municipal commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.