आम्ही युतीतच लढणार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे मत

By मुरलीधर भवार | Updated: June 17, 2023 18:12 IST2023-06-17T18:12:14+5:302023-06-17T18:12:25+5:30

कल्याण पूर्व भागातील लोकग्राम पादचारी पुलाचे भूमिपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

We will fight in alliance, says BJP District President Shashikant Kamble | आम्ही युतीतच लढणार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे मत

आम्ही युतीतच लढणार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे मत

कल्याण - शिवसेना - भाजपची युती ही विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. त्यामुळे आम्ही युतीतच लढणार असल्याचे मत भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केले.

कल्याण पूर्व भागातील लोकग्राम पादचारी पुलाचे भूमिपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हजर नव्हते. त्यावर कांबळे यांनी सांगितले, चव्हाण यांना आमंत्रण होते. त्यांना एक बैठक असल्याने ते हजर राहू शकले नाहीत. स्थानिक पातळीवर मतभेद असतात. त्यांच्या चुका आम्ही निदर्शनास आणून दिल्या. आमच्या चुका त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यामुळे आता वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: We will fight in alliance, says BJP District President Shashikant Kamble