Ward level volunteer appointments for senior citizens, orders of the Commissioner of kdmc | ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभाग स्तरावर स्वयंसेवक नेमा, आयुक्तांचे आदेश 

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभाग स्तरावर स्वयंसेवक नेमा, आयुक्तांचे आदेश 

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या भयानक परिस्थितीत वारंवार बाहेर जाता येत नसल्याने जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यावर उपाय म्हणून प्रभाग क्षेत्र अधिका-यांनी त्यांच्या प्रभाग स्तरावर स्वयंसेवकांची नेमणूक करावी, असे आदेश केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेत. 

स्वयंसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच पोचविण्याचे काम केले जाणार आहे. जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणाऱ्या दुकानदारांना जेष्ठ नागरिकांपर्यंत होम डिलिव्हरी उपलब्ध करून देण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्यास दुकानदारांनी स्वयंसेवक उपलब्ध करून घेण्यासाठी संबंधित प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी यांच्याशी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे मार्फत करण्यात आले आहे. 

प्रभाग क्षेत्र अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे

1/अ प्रभागक्षेत्र अधिकारी 
राजेश सावंत - 9819504304

2/ब प्रभागक्षेत्र अधिकारी
चंद्रकांत जगताप - 9867727361

3/क प्रभागक्षेत्र अधिकारी
अक्षय गुडधे - 8411088964

4/जे प्रभागक्षेत्र अधिकारी
वसंत भोंगाडे - 9969336832

5/ड प्रभागक्षेत्र अधिकारी
सुधिर मोकल - 9594837731

6/फ प्रभागक्षेत्र अधिकारी
भरत पाटील - 9967914383

7/ह प्रभागक्षेत्र अधिकारी
सुहास गुप्ते - 9819411491

8/ग प्रभागक्षेत्र अधिकारी
संदीप रोकडे - 9869463280

9/आय प्रभागक्षेत्र अधिकारी
दिपक शिंदे - 9890571391

10/ई प्रभागक्षेत्र अधिकारी
भारत पवार - 8356888300
 

Web Title: Ward level volunteer appointments for senior citizens, orders of the Commissioner of kdmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.