शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विशालचे बनावट फेसबुक अकाउंट; गुन्हा दाखल करा, माजी नगरसेवक गायकवाड यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:07 IST

...दरम्यान, सूर्यवंशी यांनी केलेला खुलासा फेटाळत विशालचे बनावट फेसबुक अकाउंट बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी रविवारी पोलिस ठाण्यात केली.

कल्याण :  अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा विशाल गवळी हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे, असा आरोप माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला होता. मात्र हा आरोप फेटाळत भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी विशालच्या फेसबुक पेजवरील गायकवाड यांचा फोटो आणि त्यांच्या समर्थनार्थ टाकलेला मजकूर दाखवला होता. दरम्यान, सूर्यवंशी यांनी केलेला खुलासा फेटाळत विशालचे बनावट फेसबुक अकाउंट बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी रविवारी पोलिस ठाण्यात केली.

नरेंद्र सूर्यवंशी यांनी शनिवारी गवळीचे फेसबुक पेज दाखवत त्यातील गायकवाड यांच्या फोटोमधील मजकूर हा त्यांच्या समर्थनार्थ असल्याचे दाखवले होते. दरम्यान, गवळीला वाचविण्यासाठी भाजप उद्योग करीत असून, गवळीचे बनावट फेसबुक अकाउंट बनविणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

निकमांकडे हा खटला देऊ नका - अल्पवयीन मुलगी अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देऊ नये.- निकम हे भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत लढले होते. त्यामुळे ते  गवळीला वाचविण्याचा प्रयत्न करतील. आपण राज्य सरकारकडे याबाबत मागणी करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.    

प्रतीकात्मक पुतळा लटकवून फाशी नराधम विशाल गवळीचा प्रतीकात्मक पुतळा बनवून त्याला फाशी देत शिवाजी कॉलनी परिसरातील चौकात लटकवत नागरिकांनी अनोखे आंदोलन छेडले. शनिश्वर मित्रमंडळ आणि अष्टविनायक सेवा मंडळ यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गवळीच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देत हत्येच्या घटनेचा निषेध केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस