शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video: शाळेत जाणाऱ्या ७ वर्षीय मुलीवर १०-१५ भटक्या कुत्र्यांचा हल्ला; सुरक्षारक्षकामुळे टळला अनर्थ, डोंबिवलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:25 IST

शहरातील खोणी पलावा परिसरातील ऑर्किड सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. शाळेत जाणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर १० ते १५ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

डोंबिवली: शहरातील खोणी पलावा परिसरातील ऑर्किड सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. शाळेत जाणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर १० ते १५ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सुदैवाने, सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखल्यामुळे या मुलीचा जीव थोडक्यात वाचला आहे.

राज्यात मोठा राजकीय भूकंप? मविआ फुटीच्या उंबरठ्यावर; काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर, कारण...

नेमकी घटना काय?

सोमवारी सकाळी ही मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. ती सोसायटीच्या परिसरातून जात असताना, तिथे आधीच कळपाने बसलेल्या १० ते १५ भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर मागून हल्ला केला.  कुत्रे अंगावर धावून आल्याने ती प्रचंड घाबरली आणि बचावासाठी पळू लागली. यामुळे कुत्रे अधिक आक्रमक झाले आणि तिच्या मागे धावू लागले.

सुरक्षारक्षक ठरला 'देवदूत'

कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मुलगी जोराने किंचाळू लागली. तिचा आवाज ऐकताच परिसरात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने तातडीने त्या दिशेने धाव घेतली. त्याने लाठीच्या सहाय्याने कुत्र्यांना हुसकावून लावले, यामुळे कुत्र्यांनी मुलीची पाठ सोडली. या घटनेत मुलगी सुदैवाने गंभीर जखमी झाली नसली, तरी ती प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे.

नागरिकांमध्ये संतापाची लाट

पलावा सारख्या उच्चभ्रू वस्तीत भटक्या कुत्र्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आणि स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stray dog attack on girl in Dombivli averted by guard.

Web Summary : A seven-year-old girl was attacked by stray dogs near Mumbai. A security guard intervened, saving her. Residents demand action against stray dogs.
टॅग्स :dogकुत्राViral Videoव्हायरल व्हिडिओ